logo
add image
add image
Blog single photo

मुळशी पंचायत समिती आवारातील पार्किंग म्हणजे असून अडचण अन नसून खोळंबा


पौड : येथील पंचायत समितीचे कार्यालयाच्या आवारात असलेल्या वाहन तळ "असून अडचण नसून खोळंबा" ठरत आहे. येथे जाणारा रस्ता एक महिन्यापासून खोदून ठेवल्याने येणारी चारचाकी वाहने कोठेही लावाण्यात येत आहे. परिणामी  मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.       

             मुळशी पंचायत समिती कार्यालयाच्या पौड येथील कमानीपाशीच मोठे मैदान आहे. या मैदानावर तीस ते चाळीस चारचाकी वाहने लावण्यात येत होती. माञ सध्या या मैदानाकडे जाणारा रस्ता गेल्या एक महिन्यापासून खोदून ठेवला आहे. त्यामुळे वाहने लावण्यासाठी आत जाता येत नाही.  येथे कामासाठी येणार नागरिक आपली वाहने पंचायत समितीच्या इतर जागेत कोठेही तसेच पौड गावातून, जाणाऱ्या पुणे ते दिघी बंदर महा मार्गावर कोठेही आपली वाहने लावत आहे. यामुळे पंचायत समिती कार्यालय परिसर तसेच मुख्य रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होताना दिसून येत आहे.

              मैदानात जाण्यासाठी उकरून ठेवलेला रस्ता पूर्ववत करून वाहने लावण्यासाठी तयार करावा अशी मागणी या भागात येणारे चारचाकी चालक करू लागले आहेत. जेणेकरून मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होणार नाही. 

add image
add image

Leave Comments

Top