logo
add image
add image
Blog single photo

तीन वर्षाच्या वेद मारणे याने सर केला दुर्गम तुंगी किल्ला


पिरंगुट : भोडे (ता.मुळशी) येथील तीन वर्षाच्या वेद सचिन मारणे या चिमुकल्याने मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या उशाशी असलेला तुंगी किल्ला सर केला. 

शिवजयंतीच्या चार दिवस अगोदरपासूनच वेद याला किल्यावर जायचे ' वेध ' लागले होते. कोरोनामुळे बहुतेक किल्ल्यावर प्रतिबंध असल्यामुळे तुंग हा किल्ला निवडण्यात आला. 

तुंग किल्ल्याला घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो.  दुर्गम आणि कठीण असलेल्या या किल्ल्यावर वेदने कुणाचाही आधार न घेता चढाई केली.  चढाई करताना वेदचा उत्साह किंचितही कमी झाला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने घोषणा देत नव्या उमेदीने त्याने हा किल्ला सर केला. त्याचा उत्साह आणि चढाईची लकब पाहून  किल्ल्यावर आलेले पर्यटक तसेच शिवप्रेमींकडून त्याचे आवर्जून फोटो आणि व्हिडिओ काढले गेले. शिवाय त्याचे कौतुकही केले. वयाच्या दुसऱ्या वर्षापासूनच वेदला त्याच्या आई वडिलांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांबद्दल गोष्टी सांगायला सुरुवात केली. त्यामुळे वेद मध्ये छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या किल्ल्यामध्ये प्रचंड आवड निर्माण झाली.

 यापूर्वी त्याने बऱ्याचशा किल्ल्यांवर चढाई केली आहे.  वेदला गणेश स्तोत्र पाठ करण्याची खूप आवड आहे. त्याचे संस्कृत मधील गणेश मंत्रही पाठ आहेत.  याबाबतची वेदची आजी विमल मारणे म्हणाल्या , " वेद याला लहानपणापासूनच शिवाजी महाराज आणि शूर विरांच्या कथा , व्हिडिओ , गाणी , पोवाडे तसेच देवादिकांच्या कथा , मंत्र ऐकण्याची व म्हणायची मोठी आवड आहे.  तुंगी किल्ल्यावर चढताना त्याचा उत्साह आम्हालाही थक्क करणारा होता. कुणाचाही आधार न घेता त्याने हा किल्हा चाळीस मिनिटांत सर केला. त्याच्या तीन वर्षे वयाच्या मानाने त्याने चांगली आणि आम्हाला अभिमान वाटेल अशीच कामगिरी केली त्याचे समाधान वाटते. 

add image
add image

Leave Comments

Top