माजी आदर्श जिल्हापरिषद सदस्य सुभाषभाऊ अमराळे यांच्या जयंतीनिमित्त विविध पुरस्कारांचे वितरण होणार असल्याची माहिती सचिन सुभाषभाऊ अमराळे व वसंत उर्फ बाळासाहेब अमराळे यांनी दिली. सोमवारी (दि. ४ ऑक्टोबर) घोटावडे फाटा येथील सुंदरबन लॉन्स मंगल कार्यालयात या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
सुभाष भाऊ अमराळे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात यावर्षी प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा समाजभूषण पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंदजी मोरे यांना दिला जाणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार नानासाहेब नवले त्याचबरोबर अशोकआण्णा मोहोळ उपस्थित राहणार आहेत. पेरिविंकल स्कुलचे संस्थापक राजेंद्र बांदल, पोलीस निरीक्षक संतोष भुमकर, तहसीलदार अजित गायकवाड, शुभम साहित्याचे राजुशेठ उंबासे यांचा विशेष सन्मान देऊन गौरव होणार आहे
याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा देखील मुळशी भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यामध्ये सी.ए. ऋतिक दहिभाते, सी.ए. सानिका दुर्गे, सी.ए. मोनिका शेलार, विक्रमवीर कादंबरी मोहोळ, महाराष्ट्र पोलीस मानसी सावंत, महाराष्ट्र पोलीस प्राजक्ता अमराळे, महाराष्ट्र पोलीस हर्षदा फाले, आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रसन्न कंधारे, कुस्तीवीर अनुश पिंगळे, विक्रमवीर राजाऊ मराठे, कुस्तीवीर पृथ्वीराज सुतार यांचा गौरव होणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन समस्त ग्रामस्थ अंबडवेट (पांढर) व स्व. सुभाषभाऊ अमराळे प्रतिष्ठान यांच्यावतीने केलेले आहे.