logo
add image
add image
Blog single photo

नरेंद्र कुस्ती क्‍लबचे घवघवीत यश


पिरंगुट : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या ६४ व्या महाराष्ट्र केसरी अजिंक्यपद स्पर्धेसाठी मुळशी तालुका कुस्तीगीर संघाने पै.अमोल बुचडे कुस्ती अकॅडमी मारुंजी येथे घेतलेल्या *"मुळशी  तालुका निवड चाचणी"* स्पर्धेमध्ये उरवडेच्या नरेंद्र कुस्ती क्लबने विजयी सलामी दिली.  यावर्षी देखील नरेंद्र हेल्थ क्लबच्या मल्लाने यशोगाथा कायम ठेवली. दहा पैलवानांनी यश संपादित करत कुस्ती क्लबच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
            वरिष्ठ माती विभाग ५७ किलो वजन गटात अजित लिंबोरे, ६१ वजन किलो गटात ऋतिक पोळेकर, ६५ किलो वजनी गटात ऋषिकेश सुतार, ७४ किलो वजन गटात सुरज गुंड, ८६ किलो गटात ऋषिकेश उणेचा प्रथम आले.
            गादी विभागात ६५ किलो  वजन गटात प्रज्वल गोळे, ७० किलो वजन गटात हितेश ववले,
७९ किलो वजन गटात ऋषिकेश गायकवाड प्रथम आले तर ७० किलो वजन गटात सुरज मोहोळ व ७४ किलो वजन गटात आकाश कुदळे द्वितीय आले.

           विजेत्या मल्लांना उरवडे गावचे माजी उपसरपंच, राष्ट्रीय खेळाडू पै.नरेंद्र मारणे,रामदास पोळेकर, सतिश ववले,बअमित पिंगळे, बजरंग मारणे, विवेक आवाळे, निलेश मारणे तसेच वस्ताद देवदास मारणे यांनी बहुमोल मार्गदर्शन केले होते.
         "नरेंद्र कुस्ती क्लबचे विजेते मल्ल पुणे जिल्हा आणि राज्यातही उत्कृष्ट कामगिरी करून मुळशी तालुक्याचा दबदबा निर्माण करतील" अशा भावना पै.नरेंद्र मारणे यांनी व्यक्त केल्या.

add image
add image

Leave Comments

Top