logo
add image
add image
Blog single photo

मुळशी तालुक्यातील गुणवंतांचा पत्रकारांकडून गौरव



पौड : पत्रकार संघ मुळशीच्या वतीने पौड (ता. मुळशी) येथील पत्रकार भवनात पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केत आले होते. त्यात तालुक्यातील गुणवंत खेळाडू व विद्यार्थ्यांचा आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा गौरव करण्यात आला.

               

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, दिवंगत पत्रकार दत्तात्रेय सुर्वे, बापू घावरे, ज्ञानेश ढाकूळ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात झाली. माजी सभापती रवींद्र कंधारे, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, पेरिविंकल शाळेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल, सहायक पोलिस निरीक्षक विनायक देवकर, सुभाष वाघ यांनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव करून तालुक्याती समस्या मांडण्याचे आवाहन केले. यावेळी पत्रकार संजय दुधाणे यांनी आॅस्ट्रेलियात झालेल्या क्रिकेटच्या टी-ट्वेंटी स्पर्धेतील वार्तांकनाच्या अनुभवांविषयी माहिती दिली. भारतीयांना आॅस्ट्रेलियात प्रचंड संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राम गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र शिंदे,विनायक देवकर, शिवसेना नेत्या स्वाती ढमाले, शिवसहकार सेना तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर डफळ, भाजप नेते रामचंद्र देवकर, हेरिटेज स्कूलचे संचालक कुणाल भिलारे, आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमोद बलकवडे, सरपंच अर्चना वाघ, दीपक करंजावणे, आकाश जाधव, सतीश सुतार, प्रमोद शिंदे, सचिन आकरे, गणेश भिलारे, आदी उपस्थित होते. जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, मुळशी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गंगाराम मातेरे, माजी सरपंच माऊली कांबळे, सुहास दगडे, युवा नेते लहू चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या.  

पत्रकार संघाचे अध्यक्ष नीलेश शेंडे यांनी प्रास्ताविक; तर पत्रकार प्रवीण सातव यांनी सूत्रसंचालन केले. पत्रकार विनोद माझिरे, धोंडिबा कुंभार, रमेश ससार, सतीश केदारी, दीपक सोनवणे, राजेंद्रकृष्ण कापसे, राजेंद्र मारणे, महादेव पवार, बबन मिंडे, रामदास मानकर, गोरख माझिरे, तेजस जोगावडे, सचिन केदारी, सागर शितोळे, केतन सुर्वे यांनी संयोजन केले.


गुणवंत खेळाडू व विद्यार्थ्यांचा गौरव

यावेळी सीए परीक्षेत उत्तीर्ण झालेली सायली गोरड, गुणवंत खेळाडू आरुषी प्रमोद इंगवले, राजवर्धन बाळासाहेब शेडगे, हिमांनी सुरेश चोंधे, वेदांत गणेश सणस, राष्ट्रीय जलतरणपटू गीता मालुसरे, राष्ट्रीय सम्बो कुस्ती स्पर्धेतील विजेते दत्तात्रेय शिंदे, आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच परीक्षा स्पर्धेत उत्तीर्ण झालेले रोहिदास आमले, राष्ट्रीय कुस्ती पंच परीक्षेत उत्तीर्ण झालेले विक्रम छबन पवळे, नीलेश रमेश मारणे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, महाराष्ट्र पोलिस सेवेत दाखल झालेले संग्राम मल्लिकार्जुन दिंडे, सूरज तावरे, अक्षय मरगळे यांचा सत्कार करण्यात आला. मासिक अपेक्षाचे संपादक दत्ता उभे यांच्या पत्रकारितेचा गौरव करण्यात आला.

add image
add image

Leave Comments

Top