पिरंगुट : श्री शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने रविवार (दि. ४) रोजी भव्य रक्तदान शिबिराचे पिरंगुट येथील सुरभी हाँल येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवळे यांनी दिली आहे. यानिमित्त मुळशी तालुक्यात विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल शिवराय पुरस्कार देऊन मान्यवरांना गौरविण्यात येणार आहे.मुळशीतील अधिकाधिक नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे