logo
add image
add image
Blog single photo

पौड येथे रविवारी रक्तदान शिबीर


पौड : पौड येथील श्रीमंत गणराज मिञ मंडळाच्या वतीने गणेशोत्सवामुळे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सरपंच अजय कडू आणि मंडळाचे अध्यक्ष अजय शिंदे यांनी दिली आहे.

       हे रक्तदान शिबीर रविवार ( दि.४) सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चार वेळेत पौड येथील श्रध्दा हाँस्पीटल शेजारी होणार आहे.यासाठी चक्रेश्वर मेडिकल फाऊंडेशनचे चाकण ब्लड सेंटर रक्त संकलन करणार आहे.

        दोन वर्ष कोरोना महामारीमुळे गणेशोत्सव साधेपणाने तसेच बंधनात साजरा करावा लागला. माञ यावर्षी बंधने नसल्याने गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होत आहे. तरी होणाऱ्या भव्य रक्तदान शिबीरात रक्तदांत्यानी सहभाग घेऊन रक्तदान करावे असे आवाहन माजी अध्यक्ष विपूल गुजराथी व मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

add image
add image

Leave Comments

Top