logo
add image
add image
Blog single photo

श्रीमंत कासारपाटील मित्र मंडळाने मातीच्या वस्तुपासुन साकारले मखर.


पिरंगुट : मुळशी तालुक्यात नवनविन पर्यावरण पुरक सजावटी करण्यास अग्रेसर असलेले कासारआंबोली येथील श्रीमंत कासार पाटील मंडळाने मडके,घागरी,कुंड्या व कौलापासुन बनवलेल्या मखरात यावर्षी गणेशाची प्रतिष्ठापणा केली आहे.

        देशाचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने "जरा याद करो कुर्बानी"भारतीयांना प्रबोधनपर,सामाजिक सलोखा या विषयावर नाट्य बसविले असुन.विविध गुणदर्शन स्पर्धा व गुणवंतांचा गुणगौरव सोहळा व आरोग्य शिबीराचे आयोजन केले आहे.मंडळाचे १३ वे वर्ष असुन,मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व माजी सरपंच राजेंद्र मारणे,माजी सरपंच ज्ञानोबा कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य अंजली कांबळे,माजी सरपंच सुवर्णा मारणे,विजय मारणे,सागर कांबळे,प्रशांत मारणे, बापुराव पाटील,किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष शेखर इंगवले,उपाध्यक्ष इंद्रजित वाघ,कार्याध्यक्ष श्रीधर पांडे,प्रतिक मारणे,विक्रम मारशेटीवार,किसन चौबे,हनुमंत माचापुरे इत्यादी कार्यकर्त्यांनी गणेशोत्सवाचे नियोजन केले आहे.

add image
add image

Leave Comments

Top