logo
add image
add image
Blog single photo

पिरंगुट ग्रामपंचायतीस सन २०१९-२० स्मार्ट ग्राम पुरस्कार


मुळशी : पिरंगुट (ता. मुळशी) येथील ग्रामपंचायतीला पुणे जिल्हा परिषदेचा स्मार्ट ग्राम तथा आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सरपंच चांगदेव निवृती पवळे व ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय धोंडीबा भोजणे यांनी हा पुरस्कार स्विकारला.
                महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्मार्ट ग्राम तथा आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार दिला जातो. पिरंगुट ग्रामपंचायतीस सन २०१९-२० साठी हा तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळाला आहे. स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि दहा लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
                यावेळी आमदार सुनील शेळके, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रमोद काकडे, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबूराव वायकर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पूजा पारगे, समाज कल्याण समितीच्या सभापती सारिका पानसरे, अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर आदी उपस्थित होते.
               घनकचरा व्यवस्थापन, संपूर्ण गावात मीटरद्वारे पाणी पुरवठा, संपुर्ण संगणकीकृत कार्यालय यामुळे या पुरस्कारास ग्रामपंचायत पात्र ठरली आहे. सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था तसेच सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानेच हा पुरस्कार मिळाला आहे, - सरपंच चांगदेव पवळे व ग्रामविकास अधिकारी डी. डी. भोजणे

add image
add image

Leave Comments

Top