logo
add image
add image
Blog single photo

माती विभागातून सुसचा सुशील चांदेरे तर गादी विभागातून नेरेचा सौरभ शिंदे विजेता


मुळशी : मुळशी तालुका निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत माती विभागातून सुसचा सुशील चांदेरे तर गादी विभागातून नेरेचा सौरभ शिंदे विजेते ठरले. पुणे जिल्हा निवड चाचणी स्पर्धेत हे दोन्ही मल्ल मुळशी तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
              महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी मुळशी तालुका निवड चाचणी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मारुंजी (ता. मुळशी) येथील अमोल बुचडे कुस्ती अकादमी येथे ही स्पर्धा संपन्न झाली. यावेळी रुस्तुम ए हिंद पै. अमोल बुचडे,
कुस्ती संघाचे अध्यक्ष पै. शिवाजी तांगडे, स्वास्तिक चोंधे, प्रभाकर बुचडे, शहाजी बुचडे, जालिंदर बुचडे, धोंडीबा लांडगे, आण्णा पवळे, बाळासाहेब लेणे, पांडुरंग खाणेकर, प्रा. किसन बुचडे, विठ्ठल झुंजूरके, नरेंद्र मारणे आदी मान्यवर उपस्थित होते. 
             स्पर्धेतील विजेत्या मल्लाना मुळशी तालुका कुस्ती संघाचे माजी अध्यक्ष स्वर्गीय सुरेशदादा हारपुडे यांच्या स्मरणार्थ बक्षिसे देण्यात आली. राष्ट्रीय खेळाडू वस्ताद पंकज हारपुडे यांनी ही बक्षिसे दिली.  
            स्पर्धेसाठी पंच म्हणून चंद्रकांत मोहोळ,  रोहिदास आमले, विठ्ठल मोहोळ, हनुमंत मणेरे, सागर तांगडे, निलेश मारणे, संजय दाभाडे यांनी काम पाहिले. स्पर्धा संयोजक कपिल बुचडे यांनी सर्वांचे स्वागत केले व आभार मानले. 

 *अंतिम निकाल खालील प्रमाणे* 
 
 *माती विभाग* 

*५७ किलो -* 
प्रथम - अजित लिंबोरे (पिरंगुट)
द्वितीय - विश्वजित करंजावणे (भुकूम)
 *६१ किलो -* 
प्रथम - ऋतीक पोळेकर (मारणेवाडी)
द्वितीय - आकाश भडके (भूगांव)
 *६५ किलो -* 
प्रथम - ऋषिकेश सुतार (कासारआंबोली)
 *७० किलो -* 
प्रथम - सनी भागवत (भूगांव)
द्वितीय - औदुंबर शेळके  (मांदेडे)
 *७४ किलो -* 
प्रथम - सूरज गुंड (उरवडे)
द्वितीय - ऋषिकेश खाटपे (भुकूम)
 *७९ किलो -* 
प्रथम - विशाल रानवडे (नांदे)
द्वितीय - अविनाश हळंदे (कोंढूर)
 *८६ किलो -* 
प्रथम - ऋषिकेश उणेचा (भूगांव)
द्वितीय - यश भिलारे (आंबेगाव)
 *९२ किलो -* 
प्रथम - शुभम मांडेकर (चांदे)
द्वितीय - जिवन हिंगडे (माण)
 *९७ किलो -* 
प्रथम - आकाश रानवडे (नांदे)
 *८६-१२५ किलो -* 
प्रथम - सुशील चांदेरे (सुस)
द्वितीय - युवराज वाकळे (हिंजवडी)

 *गादी विभाग* 

*५७ किलो -* 
प्रथम - अभिषेक जाधव (कासारसाई) 
द्वितीय - जयदीप घारे (पिंपपोळी)
 *६१ किलो -* 
प्रथम - अतुल आंग्रे (भुकूम)
 *६५ किलो -* 
प्रथम - प्रज्वल गोळे (पिरंगुट)
द्वितीय - ओम गायकवाड (म्हाळुंगे)
 *७० किलो -* 
प्रथम - हितेश ववले (भरे)
द्वितीय - सुरज मोहोळ (मुठा)
 *७४ किलो -* 
प्रथम - शिवाजी वाकळे (हिंजवडी)
द्वितीय - आकाश कुदळे (लवळे)
 *७९ किलो -* 
प्रथम - ऋषिकेश गायकवाड (कासारआंबोली)
द्वितीय - प्रज्वल सणस (भुगाव)
 *८६ किलो -* 
प्रथम - अभिजित पवार (भुगाव)
द्वितीय - स्वप्नील कातरट (पोंमगाव)
 *९२ किलो -* 
प्रथम - तुषार तांगडे (भूगांव)
द्वितीय - ओंकार हुलावळे (हिंजवडी)
 *९७ किलो -* 
प्रथम - आनंद मोहोळ (मुठा)
द्वितीय - अतुल मोहोळ (मुठा)
 *८६-१२५ किलो -* 
प्रथम - सौरभ शिंदे (नेरे)
द्वितीय - पवन धुमाळ (माण)

फोटो ओळ
मारुंजी (ता. मुळशी) : येथे आयोजित मुळशी तालुका निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत सहभागी झालेले मल्लां बरोबर उपस्थित मान्यवर

add image
add image

Leave Comments

Top