गेली दोन वर्षे डॉ. बाबासाहेबांची जयंती उत्सव व पुण्यतिथीनिमित्त अभिवादन अशा दोन्हीही कार्यक्रमात नागरिकांनी कोरोना निर्बंधांमुळे अतिशय संयम पाळला आणि नियमांचे काटेकोर पालन केले. आता हे कोरोनाचे सावट कमी झाल्यामुळे ठिकठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विवीध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
बावधन येथे अनुसूचित जाती मोर्चा पुणे जिल्हा भाजपाचे जिल्हाध्यक्ष मयुर चंद्रकांत कांबळे यांच्यावतीने परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 400 किलो साखर वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच 1000 लोकांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
यावेळी मा. जिल्हा परिषद अध्यक्षा सविता दगडे, नगरसेवक किरण दगडे पाटील, नगरसेवक दिलीप वेडे पाटील, मा. सरपंच निलेश दगडे पाटील, माजी उपसरपंच दीपक दगडे पाटील, सुर्यकांत भुंडे, अभिजित दगडे, आझाद दगडे, पश्चिम महाराष्ट्र आरपीआय अध्यक्ष संतोष गायकवाड, महाराष्ट्र प्रदेशाचे समाज एकिकरण संघाचे अध्यध तुकाराम रंधवे, पुणे शहर भाजपा उपाध्यक्ष राहुल कोकाटे, पुणे शहर युवा मोर्चा सरचिटणीस रोहन कोकाटे, पुणे शहर काँग्रेस सरचिटणीस मंगेश निम्हण, विठ्ठल गायकवाड, विक्रम कांबळे, आकाश कदम, संतोष शिंदे, अनिल जोंधळे, गणेशराव खेडकर, मल्लाप्पा कांबळे, दिलीप धबाले, विकास काळे, कृष्णा परदेशी, अक्षय सकट, अथर्व पठारे, चिक्या वाघमारे, अतुल गायकवाड, शुभम मारणे, सुधाकर कांबळे, राकेश कांबळे, कैलास चोंधे, देवा ओहोळ, बाबू मल्हारी, दिलीप घटकांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
अनुसूचित जाती मोर्चा पुणे जिल्हा भाजपाचे जिल्हाध्यक्ष मयुर चंद्रकांत कांबळे हे बावधनमध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहेत. आपल्या परिसरामध्ये सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी कार्यात नेहमीच पुढाकार घेतला आहे. अनेक सामाजिक कार्य करीत त्यांनी लोकसेवेचा वसा जपला आहे. त्यांचे सर्वांकडून कौतुक होत आहे.