logo
add image
add image
Blog single photo

अंदमानातील पोर्ट ब्लेअर येथे महाराष्ट्रातील सावरकरप्रेमींकडून सावरकर पुण्यतिथी साजरी


पिरंगुट : अंदमान मधील पोर्ट ब्लेअर मधील सेल्युलर जेल येथे   स्वातंत्र्यवीर  वि दा सावरकर यांची पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.

महाराष्ट्र राज्यातील विविध संस्था तसेच समूह यांनी यावेळी जयोस्तुते.....  , ने मजसी ने परत मातृभूमीला......  आदी सावरकररचित गीते सामूहिक सादर केली . अरुंधती  वैद्य यांनी  हिंदू हृदयाचा सम्राट खरा , जन्मा येऊनि केले तू अनंत उपकार ही   सावरकर यांच्या चरित्रावर आधारित    स्वरचित   कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळविली

पुण्यातील कॅप्टन निलेश गायकवाड टूर च्या माध्यमातून सावरकर पुण्यतिथी निमित्त  अभिवादन यात्रा आयोजित केली होती . या यात्रेतील सावरकर प्रेमींनी  सेल्युलर जेलच्या समोरील सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पूजन केले.  मुंबईच्या  ज्येष्ठ नागरिक  रोहिणी रसाळ  व विकास पाठक यांच्या हस्ते सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला व  पूजन करण्यात आले.  पुण्याचे श्रीनिवास शिंदीकर यांनी शंखध्वनी करून आगळीवेगळी आदरांजली अर्पण केली.  यावेळी  पत्रकार संघ मुळशीचे संस्थापक अध्यक्ष व दैनिक सकाळचे प्रतिनिधी धोंडीबा कुंभार  यांनी मनोगत व्यक्त करून  सावरकरांना आदरांजली वाहिली . पुण्याच्या काळे मॅडम यांनीही सावरकरांना काव्यातून आदरांजली वाहिली. नाशिकचे मिलिंद कुलकर्णी , पुण्याचे विजय कुलकर्णी , कोल्हापूरचे श्री पुरोहित काका , मुळशीतून संजय शितोळे , श्रीरामपूरचे एस. पी. चौधरीसर तसेच  महाराष्ट्रातून हजारो सावरकरप्रेमी यावेळी उपस्थित होते.  दरम्यान , उपस्थितांनी येथील सावकर कोठडीतील सावरकरांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.  सूत्रसंचालन वसुधा गोरे यांनी केले . उत्तम  मोंडल , सौरभ देबनाथ , उदायदास  किशन यांनी संयोजन केले होते . पुण्याच्या शुभांगी बहुलीकर यांनी या यात्रेसाठी अचूक व उत्तम मार्गदर्शन केले होते. 

add image
add image

Leave Comments

Top