पिरंगूट : भुगाव ( ता. मुळशी ) ग्रामपंचायतच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांसाठी माताळवाडी फाटा येथे सार्वजनिक वाचनालय तसेच विरंगुळा केंद्र सुरू करण्यात आले असून याचे उदघाटन सरपंच निकीता सणस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच सतिश इंगवले,माजी उपसरपंच विशाल भिलारे ग्रामपंचायत सदस्य सुरेखा शेडगे, अर्चना सुर्वे, वैशाली सणस, प्रभाकर सुर्वे,दिनकर शेडगे, दिलीप सुर्वे,निवृत्ती शेडगे,गुलाब सुर्वे, अंकुश सणस,दत्तात्रय शेडगे,कुलदीप शेडगे,नितीन शेडगे, विशाल सुर्वे,गिरीष सुर्वे मातळवाडी फाटा येथील जेष्ठ नागरिक,ग्रामपंचायत कर्मचारी,आणि समस्त ग्रामस्थ मंडळी भुगाव उपस्थित होते.