logo
add image
add image
Blog single photo

शिवसेना - युवासेनेकडून शासन आपल्या दारी, ठाकरे सरकार घरोघरी व मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन : युवासेना जिल्हाप्रमुख अविनाश बलकवडे यांची माहिती.


पौड: मुळशी तालुका शिवसेना - युवासेना व सर्व अंगीकृत संघटना यांच्या वतीने छञपती शिवाजी महाराज व हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शासन आपल्या दारी, ठाकरे सरकार घरोघरी व मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती युवासेना जिल्हाप्रमुख अविनाश बलकवडे यांनी दिली आहे.

       या शिबीराचे पौड,माले,घोटावडे व पिरंगूट मंडलातील सर्व गावातील नागरिकांसाठी शनिवार ( दि.२०) रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत माले येथील कृष्ण ( पिंक गार्डन ) येथे आयोजन करण्यात आलेआहे.या शिबीराचे उदघाटन विधान परिषदेच्या उपसभापती डाँ. निलम गोह्रे, शिवसेना उपनेते रविंद्र मिर्लेकर यांच्या हस्ते होणार असून पुणे जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख सत्यवान उभे तसेच पुणे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे उपस्थित राहणार आहेत.

      शासन आपल्या दारी योजने अंतर्गत आँनलाईन सातबारा चुकदुरूस्ती, सातबारा वरील बोजा कमी करणे, पीएम किसान योजना, जेष्ठ नागरिकांसाठी एस.टी पास, नवीन वीज कनेक्शन, आधार कार्ड दुरूस्ती,वारस नोंद,रेशनिंग कार्ड मध्ये नाव वाढविणे, नवीन रेशनिंग कार्ड, पँनकार्ड, संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुंटूब लाभ योजना, डोमेसाईल दाखला, श्रवणबाळ सेवा निवृत्ती योजना, महावितरण योजना, उत्पनाचा दाखला या योजनांचा लाभ घेता येणार आहे. तसेच हृदयरोग, रक्तदाब, हिमोग्लोबीन, रक्तगट,रक्तशर्करा,ईसीजी,नेञ तपासणी, मोतीबिंदू तपासणी, नाक,कान,घसा तसेच सर्व प्रकारच्या आजारावर तज्ञ डाँक्टरांकडून तपासणी व मार्गदर्शन केले जाणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन युवासेना पुणे जिल्हाप्रमुख अविनाश बलकवडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

add image
add image
  • Blog single photo
    2021-02-16 11:27:44

    Anita Malusare

    Very nice thoughts and keep progressing .All the best for ur future works.

  • Blog single photo
    2021-02-18 10:39:36

    Shashikant Mirkute

    सर्वसामान्य जनतेच्या गरजा ओळखून केलेले स्तुत्य कार्य !!

Leave Comments

Top