logo
add image
add image
Blog single photo

पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम


पिरंगुट, दि. ७ (वार्ताहर) - पत्रकार हे देखील समाजाला दिशा देण्याचे काम करतात. समाजातील अन्यायकारक गोष्टीला वाचा फोडण्याचे काम पत्रकार करत असतात. त्यातूनच सर्वसामान्य नागरिकाला न्याय मिळतो, असे प्रतिपादन हवेलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांनी केले.

                भुगाव (ता. मुळशी) येथे मुळशी तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना "आयडॉल ऑफ मुळशी" पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाऊसाहेब ढोले बोलत होते. यावेळी वेदांतचार्य मंदार महाराज येनपुरे (धार्मिक), दिलीप चोरघे (उद्योग), प्रमोद बलकवडे (आपत्ती व्यवस्थापन), दत्तात्रय शेळके (कृषी), शुभांगी शिंदे (अंगणवाडी सेविका) यांना 'आयडॉल ऑफ मुळशी" पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पीडीसीसी बँकेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल सुनील चांदेरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. 

                 यावेळी पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ,  जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे, मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे, मुळशी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गंगाराम मातेरे, पेरिविंकल शाळेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल, शिवसेना तालुका प्रमुख सचिन खैरे, म्हाडाच्या संचालिका स्वाती ढमाले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दगडूककाका करंजावणे, पिरंगुटचे सरपंच चांगदेव पवळे, भुगावच्या सरपंच निकिता सणस, भुकुमच्या सरपंच रेखा वाघ, माजी आदर्श सरपंच नामदेव माझिरे, उपसरपंच सचिन हगवणे, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर पवळे, शिवसेना समनव्यक दीपक करंजावणे, राष्ट्रवादी विद्यार्थीचे माजी जिल्हाध्यक्ष जितेंद्र इंगवले, संतोष पवळे, पोलिस पाटील राम मानकर, शरद पवार, उद्योजक अजित इंगवले, गोविंद आंग्रे, अक्षय सातपुते, मुळशी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद माझिरे, माजी अध्यक्ष बंडू दातीर, जितेंद्र गोळे, राम गायकवाड, माजी सरपंच राहुल दुधाळे, सूर्यकांत भुंडे, उमेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

               मंदार महाराज येनपुरे म्हणाले, संस्कार आणि संस्कृती बिघडली की समाज बिघडतो. शिक्षित समाजासाठी सुशिक्षित आणि संस्कारक्षम शिक्षण देणे गरजेचे आहे. चांगले विचार समाजासमोर ठेवून आदर्शवत  योग्य समाज घडवण्याचे काम पत्रकार करत आहे.

              सुनील चांदेरे म्हणाले, आयडॉल ऑफ मुळशी ही चांगली संकल्पना आहे. समाजातील चांगल्या व्यक्तीला शोधून त्यांचा गौरव करणे ही स्तुत्य बाब आहे.

             महादेव कोंढरे म्हणाले, मुळशीतील पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली की रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून मदत केली जाईल.  

            कार्यक्रमाचे नियोजन दीपक सोनवणे, विजय वरखडे, गणेश अभिमाने, गोरख माझिरे, तेजस जोगावडे, प्रवीण सातव यांनी केले होते. 

            सूत्रसंचालन संदीप चव्हाण यांनी केले. प्रास्ताविक विनोद माझिरे यांनी केले. आभार प्रतिक्षा ननावरे यांनी मानले.

add image
add image

Leave Comments

Top