logo
add image
add image
Blog single photo

बावधनमध्ये श्री संत सेवालाल महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी


बावधन: बावधन येथे विद्यमान उपसरपंच दिपक दगडेपाटील यांच्या वतीने श्री संत सेवालाल महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच महिला भगिनी व लहान मुलाना खाऊ वाटप करण्यात आले.


यावेळी उपसरपंच दिपक दगडे पाटील यांचा बंजारा समाजा वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास उपसरपंच दिपक दगडेपाटील, उद्योजक मनोजआप्पा दगडेपाटील,भाऊसाहेब दगडेपाटिल, अशोक दगडेपाटील, माजी उपसरपंच तुषार दगडेपाटील, समीर दगडे, शुभम दगडे, सौरभ चिकणे, शंकर राठोड, जिवा चव्हाण, राम राठोड, अजय राठोड, सुरेश चव्हाण, रमेश चव्हाण आणि बंजारा समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

add image
add image

Leave Comments

Top