पिरंगूट : सर्वज्ञ विकास प्रबोधिनी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या "अजिंक्य आमुचे स्वराज्य किल्ले" स्पर्धेत खुला सामुहिक गट विभागातून पौड येथील हिंदवी क्रियेशनने प्रथम क्रमांक (तिकोणा ) मिळविला आहे. तर खुला वैयक्तिक गट विभागातून लवळे येथील प्रसाद कुदळे ( राजगड) प्रथम क्रमांक व शालेय गट विभागातून भुकूम येथील साईनाथ माझिरे ( प्रतापगड ) याने प्रथम क्रमांक पटकविला आहे.
सर्वज्ञ विकास प्रबोधिनी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धैत मुळशी तालुक्यातील विविध ३४ गावातील १८१ स्पर्धकांनी उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला. त्या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पिरंगुट येथील शिवकालीन तुळजा भवानी माता मंदिर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास पिरंगुटचे सरपंच चांगदेव पवळे, जेष्ठ दुर्ग अभ्यासक संतोष जाधव, आग्रावीर सरनौबत मारुती गोळे, पोलीस पाटील प्रकाश पवळे,माजी उपसरपंच रामदास पवळे, विद्यमान उपसरपंच राहुल पवळे,पोलीस पाटील स्वाती गोळे, माजी उपसरपंच लक्ष्मण निकटे, रविंद्र मोहोळ, राजाराम गोळे,सुभाष माझिरे,दत्तात्रय पवार, विनोद सातपुते, अनंता पाखरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन उपाध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर, कार्याध्यक्ष संतोष भुमकर, संचालक महेश मोहोळ, रामदास पवळे,शेखर म्होकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आदर्श शिक्षक संतोष गावडे,प्रास्तविक सर्वज्ञ संस्थेचे संस्थापक माजी सरपंच ज्ञानेश्वर पवळे यांनी तर आभार सर्वज्ञ संस्थेचे सचिव संतोष केसवड यांनी केले. या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेचे कार्यकर्ते सागर शिंदे ,आकाश मारणे तसेच पत्रकार प्रदिप पाटील, राहुल सातव,अतिश भुमकर,अमित शिंदे, सुमित सुपेकर, शुभम शेळके,नितेश खानेकर यांनी काम पाहिले. मोहन पारखी,गंगाराम आखाडे,सचिन आकरे,साहिल पवळे,विजय उभे तसेच विविध गावातील स्पर्धेक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किल्ले स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे :
खुला गट सामुहिक विभाग
प्रथम क्रमांक .हिंदवी क्रियेशन पौड (तिकोणा ), द्वीतीय क्रमांक .नळदुर्ग संघ ( नळदुर्ग ) पिंरगुट, तृतीय क्रमांक . हिराज नगर सोसायटी पिरंगुट ( पन्हाळा ), उत्तेजनार्थ . विघ्नहर्ता मित्र मंडळ. लवळे ( प्रतापगड ) , शिवशंभो मित्र मंडळ भुगाव ( रायगड ) ,अमितभाऊ वाघ युवामंच पिरंगुट ( प्रतापगड )
खुला गट वैयक्तिक विभाग
प्रथम क्रमांक . प्रसाद कुदळे लवळे ( राजगड ) ,द्वीतीय क्रमांक राहुल पाखरे बोतरवाडी ( सिंधुदुर्ग ) ,
तृतीय क्रृमांक .आदिनाथ सुपेकर पौड ( सिंहगड ),
उत्तेजनार्थ . शुभम सातव लवळे,आदित्य नलावडे पिरंगुट , प्रतिक ओझरकर पिरंगुट,
शालेय गट प्रथम क्रमांक .साईनाथ माझीरे भुकुम ( प्रतापगड ),द्वीतीय क्रमांक .सार्थक खडके पिंरगुट ( राजगड ),
शिवराज तापकीर मुलखेड ( राजगड ),तृतीय क्रमांक . वरद मांडेकर पौड ( तोरणा ), अथर्व शेलार बोतरवाडी,
उत्तेजनार्थ : सार्थक उभे भुगाव,हर्ष मोहोळ म्हाळुंगे, श्रावणी ससार मुलखेड, भार्गवी धुमाळ शिंदेवाडी,श्रेयस गोडांबे घोटावडे ,स्मित शेठ रिहे,आयुष वांजळे