logo
add image
add image
Blog single photo

मुळशीतील गरजुंना शिवसमर्थचा आधार


पिरंगुट : राष्ट्रीय  सर्वांगीण ग्रामविकास संस्थेच्या श्री शिवसमर्थ बचतगटाकडून जि. प. प्राथमिक शाळा शिंदेवाडीतील दहा गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. 

         यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.वृषाली रमेश शिंदे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कुतवळ मॅडम, सहशिक्षिका सौ.आश्विनी संदीप पवार, बचतगटाचे अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर पवळे (पाटील), सचिव योगेश गोसावी ज्येष्ठ सभासद शशिकांत धुमाळ,  सागर महादेव शिंदे, पत्रकार प्रदीप पाटील, देवराम कंधारे,   सामाजिक कार्यकर्ते संदिप शिंदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

         शिवसमर्थ बचत गटाच्या वतीने विवीध सामाजिक उपक्रम राबविले जातात. समाजातील गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, लाॅकडाऊनच्या काळात अनेक विद्यार्थ्यांचे पालकत्व हरवले, काही पालकांना रोजगार मिळवणेही अवघड झाले हीच गरज ओळखुन श्री शिवसमर्थ बचतगटाकडून तालुक्यातील अनेक गावांत सर्व्हे केला गेला. यांत ८० विद्यार्थ्यांना काहींची शालेय फी, काहींना गणवेश, तर काहींना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. यांतील ३० विद्यार्थ्यांना साहित्य वाटप झाले. येत्या महिण्यात उर्वरित विद्यार्थ्यांनाही साहित्य वाटप केले जाईल. असे बचत गटाच्या वतीने यावेळी सांगण्यात आले. 


add image
add image

Leave Comments

Top