पुणे : कोरोचा प्रादुर्भाव अजूनही कमी झालेला नाही शाळा ही पूर्ववत सुरु होण्याच्या मार्गावर आहेत. येत्या ११ तारखेपासून इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग सुरू होत आहेत याची तयारी म्हणून निरंजन सेवाभावी संस्था पुणे यांचेकडून कोळवण केंद्रातील १७ शाळांतील सुमारे पाचशे विद्यार्थी शिक्षकांना आरोग्य सुरक्षा किट व स्वच्छता किटचे वाटप नांदगाव(ता. मुळशी) येथे करण्यात आले.
यावेळी निरंजन सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष जयेश कासट, कोळवण केंद्राचे केंद्रप्रमुख मधुकर येनपुरे, शिक्षक समिती तालुकाध्यक्ष संदिप दुर्गे, सरचिटणीस कुंडलिक कांबळे, सुहास होमकर, हरी खंडागळे, पोपट नायकोडे, कविता खरात, प्रणाली गायधने, मेघा कांबळे, मंदा घरदाळे आदी विद्यार्थी पदाधिकारी व शिक्षकवृंद उपस्थित होते.
निरंजन सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष जयेश कासट यांनी केंद्रातील गरजू विद्यार्थी शैक्षणिक पालकत्व स्विकारून शैक्षणिक मदत करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदिप दुर्गे यांनी केले व आभार सुहास होमकर यांनी मांडले.