logo
add image
add image
Blog single photo

मुळशी तालुका आदर्श गणेश मंडळ स्पर्धेचे गुरुवारी बक्षिस वितरण


पिरंगुट - आबासाहेब शेळके मित्र मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या आदर्श गणेश मंडळ स्पर्धेचे बक्षीस वितरण गुरुवारी (ता. २८) होणार आहे.

             आबासाहेब शेळके मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी आदर्श गणेश मंडळ स्पर्धेचे आयोजन केले जाते. तहसील कार्यालय मुळशी आणि पौड पोलिस ठाणे यांच्या सहकार्याने ही स्पर्धा घेण्यात येते. यंदाचे स्पर्धेचे १२ वे वर्ष होते. त्याच बरोबर यावर्षी महिलांसाठी मेहंदी स्पर्धेचे तर मुलांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

             गुरुवारी (ता. २८) सायंकाळी साडेचार वाजता या तीनही स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे. शिवाव्याख्याते नितीन बानगुडे पाटील, मावळचे आमदार सुनील शेळके, दैनिक लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. पिरंगुट कॅम्प येथील सन शाइन जॉय कॉम्प्लेक्स च्या प्रांगणात हा बक्षीस वितरण सोहळा होणार आहे, अशी माहिती स्पर्धेचे मुख्य  आयोजक, उद्योजक माधवराव उर्फ आबासाहेब शेळके यांनी दिली. 

add image
add image

Leave Comments

Top