logo
add image
add image
Blog single photo

जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त स्नेह मेळाव्याचे आयोजन


पिरंगुट : फार्मासिस्ट हा हेल्थकेअर सिस्टम म्हणून आरोग्य क्षेत्रातील एक प्रमुख म्हणून ओळखला जातो. कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या लढाईमध्ये भारतातील सर्व डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार आणि पोलीस प्रशासन त्याच सोबत फार्मासिस्टने स्वत:चे मोलाचे योगदान देशासाठी दिले आणि देत आहेत. फार्मासिस्ट डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधील महत्वाचा दुवा घटक ओळखला जातो याचसाठी जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त मुळशी तालुका केमिस्ट असोसिएशन संघटने तर्फे मुळशी तालुक्यातील सर्व फार्मासिस्ट बंधु आणि भगिनींचे स्नेह मेळाव्याचे आयोजन केले गेले. 

यावेळी गेल्या 35 वर्षापासून प्रॅक्टीस करत असलेले ज्येष्ठ फार्मासिस्ट यांचे अनुभव कथन व भावी फार्मासिस्ट पिढीला स्पर्धात्मक युगासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. यामध्ये कोरोनासारख्या महामारीचे अनुभव व इथुन पुढे समाजासाठी काय नियोजन करता येईल यावरती अवलोकन झाले.

या कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रीक्टचे कार्यकारिणी सदस्य रवींद्र ढमाले, अध्यक्ष आकाश जाधव,  उपाध्यक्ष  अमित गोळे,  सेक्रेटरी विजयकुमार उणेचा,  तसेच संघटना सदस्य संतोष बोडके, अर्जुन सिंग,  महिला सदस्य अलका ववले व ज्येष्ठ सदस्य भरत कारिया यांनी केले.

add image
add image

Leave Comments

Top