पौड : पौड येथील ग्रामपंचायत जवळच राहणाऱ्या धानके कुटुंबातील व्यक्तीच्या हातला काम नाही, नौकरी नाही, उदरनिर्वाह करणे अवघड. सुरुवातीच्या काळात ग्रामस्थांनी मदत केली. घरात आजार पण असल्याने नौकरी करणे कठीण,त्यामुळे उदरनिर्वाहासाठी काहितरी करणे गरजेचे. त्याकरिता भांडवल नाही.ही अडचण आखिल बाजारपेठ तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आबासाहेब शेळके मित्रमंडळाचे संस्थापक माधवराव शेळके यांना कळविली. रेखा धानके शिलाईचे काम येत असल्याने त्यांना घरातल्या घरात रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता आबासाहेब शेळके यांनी आपल्या मंडळाच्या माध्यमाने शिलाई मशीन तात्काळ उपलब्ध करून दिली. गणपती विसर्जन प्रसंगी रेखा शेखर धानके यांना ही शिलाई मशीन भेट देण्यात आली.यावेळी पौडगावचे सरपंच जगदीश लांडगे,उपसरपंच रसिका जोशी, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद शेलार यांच्या हस्ते शिलाई मशीन धानके कुटुंबीयांकडे हस्तांतरित करण्यात आली.
यावेळी आबासाहेब शेळके मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष शाकिर शेख, सामाजिक कार्यकर्ते रोहिदास धुमाळ तसेच आखील बाजारपेठ तरुण मंडळाचे अध्यक्ष आशिष जोशी, तंटामुक्ति अध्यक्ष शामराव वाचकवडे,बाळासाहेब रायरीकर, उदय दोशी, बापू जोशी, राजू जोशी, चंद्रकांत शेलार, सलील छत्रे, विशाल राऊत, मंदार दोशी, धनंजय जोशी, अभिषेक वाचकवडे, शान आतार, सुहास जोशी,मयूर मखी, विनोद कुबडे, दत्तात्रय कुबडे, अखिल बाजारपेठ तरूण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.