पिरंगूट : मुळशी तालुक्यातील गणेश उत्सवाला एक विधायक दिशा देण्याचे काम करणाऱ्या आबासाहेब शेळके मित्रमंडळाच्या वतीने यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जाणीव जागृती व्हावी या हेतूने ऑनलाईन गणेश मंडळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
नागरिकांना पर्यावरण संवर्धनाचे महत्व समजावे व कोरोनाच्या दृष्टीने खबरदारी घेतली जावी या करिता मंडळाने एक छोटीशी चित्रफीत तयार केली असून त्या चित्रफितीला साजेसे गीत तयार केले असून व या चिटत्रफितीतून तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी व नेते मंडळी यांनी नागरिकांना आवाहन करणारे संदेश व शुभेच्छा दिलेल्या आहेत.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे कार्यकर्ते व प्रसिद्ध गीतकार विनोदजी पाटणकर यांनी गीतरचना केलेली आहे.या चित्रफितीचे अनावरण आज सकाळी पिरंगुट कॅम्प येथील बालवीर गणेश मंडळाच्या प्रांगणात करण्यात आले.प्रशासनाने घालून दिलेले नियम व गर्दी टाळून मर्यादित मान्यवरांच्या उपस्थितीत हे गीत अनावरण होणार आहे. हा डिजिटल रथ व त्यासोबत निर्जंतुकीरण संच गावोगावी जाऊन जागृती करणार असल्याची माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष शाकिर शेख यांनी दिली आहे
या वेळी मंडळाचे माधवराव उर्फ आबासाहेब शेळके, शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे,सरपंच चांगदेव पवळे ,उपसरपंच राहुल पवळे, पोलिस पाटील प्रकाश पवळे , सुनील वाडकर, महादेव अण्णा गोळे ,भानुदास गोळे ,अंकुश नलावडे, ज्ञानेश्वर पवळे,वैभव पवळे, रामदास पवळे, तुषार पवळे, अनुप पवळे, सागर पवळे ,विकास पवळे, सारिका पवळे ,जनाबाई गोळे, संतोष दादा पवळे, शाकीर शेख ,प्रवीण कुंभार उपस्थित होते.