logo
add image
add image
Blog single photo

आई - वडीलांचे छञ हरविल्यानंतर दोन मुलींच्या शिक्षणाचे स्वीकारले पालकत्व


पौड : असदे येथील आई वडीलांचे छञ हरवलेल्या इयत्ता बारावीतील प्रगती दत्तात्रय गुंड  व इयत्ता दहावीतील प्राजक्ता दत्तात्रेय गुंड यांचा सामाजिक बांधिलकी जपत मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष विलास अमराळे यांनी दोन्ही मुलींना शालेय साहित्य देत दहावी व बारावी या वर्षाचा पूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारी घेऊन त्यांचं या वर्षाचे पालकत्व स्वीकारले आहे.

        असदे येथील प्रगती व प्राजक्ता या मुलीच्या वडीलांचे सात वर्षापूर्वी निधन झाले तर आईचे यावर्षी निधन झाले. प्रगती हि पुण्यात बारावीचे शिक्षण घेत आहे तर प्राजक्ता पौड या ठिकाणी दहावीचे शिक्षण घेत आहे.या दोघींचा सांभाळ त्यांची आज्जी करत असून प्रगती व प्राजक्ता या दोघीही अभ्यासात हुशार असून त्यांच्या घरची परिस्थिती बेताची आहे. मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष विलास अमराळे यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी दोघींनाही लागणारे शालेय साहित्य उपलब्ध करून दिले तसेच दोघींच्या बारावी व दहावीच्या शिक्षणासाठी लागणारा सर्व खर्च विलास अमराळे हे स्वतः करणार असून अमराळे यांनी केलेल्या या कार्याचा आदर्श इतरांनी घेणे गरजेचे आहे.

         यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस भोर विधानसभा अध्यक्ष सुनिल चांदेरे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्ष नेहा साठे,राष्ट्रवादी युवक कोळवण गणाध्यक्ष साईदास शिंदे, राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष योगेश अमराळे उपस्थित होते.

add image
add image

Leave Comments

Top