logo
add image
add image
Blog single photo

पोलिस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा


पौड : पौड येथील वृंदा ब्युटी व फॅशन अकॅडमी मधील मुलींनी पौड पोलिस स्टेशन तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचारी बांधवांना स्वतः तयार केलेले राखी बांधून मास्क व सॅनिटायझर वाटप केले.या कार्यक्रमाचे आयोजन संजय कॉम्प्युटर्स,वृंदा ब्युटी अँड फॅशन अकॅडमी संस्थापक शुंभागी ठोंबरे यांनी केले होते.

        अकॅडमी मधून फॅशन स्टुडिओ डिपार्टमेंट मधून मास्क स्वतःच फॅशन डिझायनर ( सर्व  विद्यार्थ्यांनी ) ने स्वतः च्या हातानी मास्क शिवले व रक्षाबंधन च्या निमित्ताने आजच्या धावपळीच्या व कोरोनाच्या बिकट अवस्थेत दिवस रात्र काम करणारे व आपली रक्षा करणाऱ्या पोलीस बांधव आणि पौड येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचारी वर्ग यांना रक्षाबंधनानिमित्त राखी बांधण्यात आली.यावेळी भाजपा नेत्या भारती विनोदे,माजी जिल्हा परिषद सदस्य शिल्पा ठोंबरे,भाजपा तालुका अध्यक्ष विनायक ठोंबरे,पौड पीडीसीसी बँक मँनेजर सुरेश नांगरे, हरि गाभणे,सुषमा कारले, वैष्णवी इप्ते, राजश्री, पायल बलकवडे, नजमा खान , फात्मा खान, राजश्री कारले, साक्षी ढोरे, सायरा खान,नम्रता धनवट, निकिता कार्ले, शुभांगी  पायमोडे, मंगल बलकवडे, संचिता भिंताडे, साक्षी बलकवडे, प्रचिता इपटे, चैताली मालुसरे, ऍडमिनिस्ट्रेटर ऑफ वृंदा अकॅडमी पौड धनश्री ठोंबरे,रोहन ठोंबरे उपस्थित होते.


          डिजिटल युगात स्त्री ही कुठे ही कमी पडू नये, शैक्षणिक, क्रीडा व कौशल्य क्षेत्रात सुद्धा, व स्त्री ला सुद्धा पवित्र मानले जाते. वृंदा अकॅडमी मध्ये प्रोफेशनल ब्युटीशीयन कोर्सेस व फॅशन डिझाईनिग असे कोर्सेस घेण्यात येतात.वृंदा अकॅडमी ही मुळशी मध्ये नव्याने एक महिन्यापूर्वी प्रोफेशनल व सुसज्ज प्रॅक्टिकल लॅब सहित स्थापन झाली आहे, वृंदा अकॅडमी चा एकमेव उद्देश की ग्रामीण भागातील  सर्व गरजू व आवड असणाऱ्या मुली व महिलांना स्वतःच कौशल्य  वाढवून  त्याना स्वतःच व्यवसाय कसा करता येईल हा आहे. यासाठी  मुलीना पुण्यात प्रोफेशनल क्लासेस एवढी फि भरणे शक्य नाही म्हणून अकॅडमी मध्ये शिकणाऱ्या मुलींना "मुळशी शैक्षणिक व कौशल्य विकास संस्थे कडून स्कॉलरशिप देखील देण्यात येत असल्याचे वृंदा ब्युटी अँड फॅशन अकॅडमी संस्थापक शुंभागी ठोंबरे यांनी सांगितले.


add image
add image

Leave Comments

Top