पौड : मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संगठनेच्या राष्ट्रीय सहसचिव पदी हडशी(ता. मुळशी) येथील दिपक आनंदा ओव्हाळ तर मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संगठनेच्या (वैद्यकीय विभाग) मुळशी तालुका उपाध्यक्ष पदी डॉ.महेश आनंदराव देसाई यांची निवड करण्यात आली आहे. मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संगठन या देशपातळीवर काम करणाऱ्या या संगठनचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सतीश केदारी यांनी ओव्हाळ यांना तर केदारी आणि ओव्हाळ यांनी देसाई यांना नियुक्तीपत्र देऊन अभिनंदन केले. यावेळी मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संगठनचे पदाधिकारी हिंजवडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अजय जोगदंड, पि.चिं.मनपा चे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, शिक्षण विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गणपत बालवडकर, राष्ट्रीय संपर्क प्रमुख संदिपान साबळे, चित्रपट नाट्य कला विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुजाता भाटे, आरपिआयचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत कदम, अॅड प्रशांत जगदाळे, दशरथ जगताप, विशाल बारणे, काळूराम कांबळे, सचिन ओव्हाळ हाडशीकर व इतर मान्यवर उपस्थित होते.