logo
add image
add image
Blog single photo

मंगळवारी पौडला कृषी पर्यटन प्रशिक्षण


पौड : पर्यटन संचालनालय महाराष्‍ट्र शासन यांच्‍या माध्‍यमातून पंचायत समिती मुळशी कृषी विभाग, युनिक पाथस कृषी पर्यटन केंद्र व युनियन बॅंक ऑफ इंडिया कोळवण शाखा यांच्‍या संयुक्‍त विदयमाने मुळशी तालुक्‍यातील शेतकरी व युवकांसाठी 'मोफत कृषी पर्यटन प्रशिक्षण' आयोजित करण्‍यात आले आहे. मंगळवार (ता.३) रोजी मुळशी पंचायत समितीच्‍या सेनापती बापट सभागृहात सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत प्रशिक्षण देण्‍यात येणार आहे. 

संकल्‍पना काय आहे, कृषी व ग्रामीण पर्यटनाचे उददेश, व्‍याप्‍ती, संधी, व्‍यवस्‍थापन, नियोजन, कृषी पर्यटन शेतीला पुरक जोड व्‍यवसाय कसा होऊ शकतो, मुळशी मध्‍ये पर्यटनाला कसा वाव आहे, पर्यटनाविषयी धोरण, संलग्‍न विभागाच्‍या योजना, कृषी पर्यटनासाठी बॅंक कर्ज, वित्‍त पुरवठा प्रक्रिया, कृषी पर्यटनाला जोडून इतर व्‍यवसाय व त्‍यासाठी बाजारपेठ, निवासी व अनिवासी पर्यटन, इमारत नसतानाही कृषी पर्यटन, गाईड तयार करणे, मार्केटींग इत्‍यादी बाबींचे प्रशिक्षण देण्‍यात येणार आहे. 

'प्रथम येणा-यास प्राधान्‍य प्रमाणे कोरोना पार्श्‍वभुमीवर मर्यादीत प्रवेश आहे, शासनाच्‍या संबंधित विभागांचे प्रशस्तिपत्रक देण्‍यात येणार आहे. मुळशी तालुक्‍यातील पर्यटन संधीचे सोने करण्‍यासाठी जास्‍तीत जास्‍त लाभार्थींनी नोंदणी करावी,' असे आवाहन 'युनिक पाथस' कृषी पर्यटन केंद्राचे संचालक दत्‍तात्रय शेळके यांनी केले.

नोंदणीसाठी युनिक पाथस कृषी पर्यटन केंद्राचे दत्‍तात्रय शेळके- ७३७८५०१०००, कृषी अधिकारी भालेराव-९८२२४६११५६, मंडल कृषी अधिकारी अर्जुन जाधव-९०२२५२५५७३.

add image
add image

Leave Comments

Top