logo
add image
add image
Blog single photo

संकटसमयी धावून जाणे हाच खरा मानवता धर्म : तहसिलदार अभय चव्हाण


पिरंगुट : नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या नागरिकांना भारतीय नागरिक या नात्याने मदतीचा हात देऊन  संकट समयी धावून जाणे हाच खरा मानवता धर्म  आहे . सध्या कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कोकण वासीयांना एक  हात मदतीचा या भावनेने पिरंगुट ( ता. मुळशी) येथील व्यापारी संघटना व पिरंगुट ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या पुढाकारातून  जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून पिरंगुट करांनी हा मानवता धर्म खऱ्या अर्थाने जपला आहे. ही बाब खूप अभिनंदनीय असल्याचे मत मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी व्यक्त केले. 

         महाड येथील पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीकरिता उपसरपंच राहुल पवळे व मित्रपरिवार यांच्या वतीने जमा करण्यात आलेल्या जीवनावश्यक वस्तुंचा ट्रक  विविध मान्यवरांच्या उपस्थित पिरंगुट येथील हॉटेल रत्नाई येथुन  महाड तहसील कार्यालयाकडे रवाना करण्यात आला. मुळशीचे तहसीलदार कार्यक्रम प्रसंगी अभय चव्हाण बोलत होते. व्यापारी संघटनेच्या पुढाकाराने व उपसरपंच राहुल पवळे यांच्या विशेष प्रयत्नातून जमा करण्यात आलेली मदत हॉटेल रत्नाई समोरील पेट्रोल पंप येथून महाड तहसील कार्यालयाकडे रवाना करण्यात आली. यावेळी मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते साहित्याच्या टेम्पोचे पूजन करण्यात आले.

      याप्रसंगी पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, कोकण कृषी विद्यापीठ प्रतिनिधी सुधीर वाडकर,  पिरंगुटचे सरपंच चांगदेव पवळे, पिरंगुट व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष व  उपसरपंच राहुल पवळे, शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे, जिल्हा संघटक राम गायकवाड, जिल्हा संघटिका स्वाती ढमाले, उद्योजक श्रीधर जोशी, शिवसेना नेते आबासाहेब शेळके, संस्थापक आर.यस.जी.यस संस्था अनिल व्यास, राष्ट्रवादी काँग्रेस नेते सुहास दगडे, मा उपसरपंच रामदास पवळे, सहाय्यक पोलीस फॊजदार संतोष कुंभार,  मा सरपंच ज्ञानेश्वर पवळे, मा. तंटामुक्ती अध्यक्ष भानुदास गोळे,आदर्श शिक्षक संतोष गावडे, युवा उद्योजक किरण गोळे, मा. सरपंच बाळासाहेब शेडगे, मा उपसरपंच अक्षय सातपुते, मा ग्रामपंचायत सदस्य मोहन आवळे, मा सरपंच शंकर मरगळे, ग्रामपंचायत मा उपसरपंच व सदस्य विकास पवळे, रामदास गोळे, प्रवीण कुंभार, लक्ष्मण निकटे, सुरेखा पवळे, छाया पवळे, डॉ. वैशाली पाटील, डॉ. राहुल पाटील, पोलीस पाटील स्वाती गोळे, रेश्मा पवळे, सारिका केदारी, सारिका गोळे, आश्विनी निकटे, किशोर येवले, योगेश पवळे, मयूर शितोळे, महेश दरेकर, आनंद नोगजा, बजरंग गोळे, गायकर सर, सागर पवळे, ओंकार शिंदे, सुमीत पवळे, शुभम शेळके, शाकिर शेख आदी तसेच  विविध पक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.  ही मदत उभी करण्यात संस्थापक अध्यक्ष शिवराय प्रतिष्ठान संतोष पवळे, डायरेक्टर मुळशी मेडिकल अमित गोळे, अध्यक्ष जय तुळजा भवानी ट्रस्ट सचिन पवळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार  प्रदर्शन माजी सरपंच रामदास पवळे यांनी केले.   

add image
add image

Leave Comments

Top