पौड : डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान च्या वतीने अध्यक्ष पद्मश्री डॉ श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिन धर्माधिकारी यांनी संपूर्ण भारतामध्ये आरोग्य शिबिरे, जलपुनर्भरण योजना, महास्वच्छता अभियान , रक्तदान शिबिरे अशा विविध समाज उपयोगी केलेल्या सामाजिक कार्याचे योगदान हे खूप मोठे असल्याचे मत पौड पोलिस स्टेशनचे सहाय्य पोलिस निरीक्षक विनायक देवकर यांनी पौड येथे व्यक्त केले.
पौड ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या तैलचित्राचे अनावरण सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक देवकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक देवकर , मुळशी तालुका पञकार संघाचे अध्यक्ष विनोद माझिरे,तहसील कार्यालयातील कर्मचारी मनोहर लोले,पौडचे सरपंच जगदीश लांडगे, उपसरपंच रसिका जोशी, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद शेलार ,अजय कडू,प्रशांत वाल्हेकर,ग्रामविकास अधिकारी विजय कदम, युवासेना संघटक संकेत दळवी ,माजी ग्रामपंचायत सदस्य किरणकुमार आगनेन, शामराव नवले, सागर लांडगे, विजय पिंगळे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद शेलार यांनी केले तर आभार ग्रामविकास अधिकारी विजय कदम यांनी मानले.