भुगाव: सामाजिक कार्यकर्ते मनोहर सणस व भाजपा महिला आघाडी अध्यक्षा वैशालीताई सणस यांच्या संकल्पनेतुन भुगाव(ता. मुळशी) येथे आपले सरकार सेवा केंद्राचे उद्धाटन करण्यात आले असुन नागरिकांना अनेक प्रकारचे परवाने भूगावमध्येच काढून मिळणार आहे. यामुळे प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी कार्यालयात असंख्य फेऱ्याही माराव्या लागणार नाही.
हा उद्घाटन सोहळा मुळशी तालुका भाजपा अध्यक्ष विनायक ठोंबरे, राहुल इंगवले, चंद्रकांत मेंगडे, मनोहर सणस, संध्या देशपांडे, माधवी सुतार, अर्चना सुतार यांच्या उपस्थितीत पार पडला.
आपले सरकार सेवा केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध प्रकारची प्रमाणपत्रे, परवाने, अनुज्ञप्ती आणि इतर सेवा प्रदान केल्या जाणार असुन. केंद्रचालक नागरिकाला आवश्यक असणाऱ्या सेवेचा अर्ज ऑनलाईन भरून नागरिक आवश्यक त्या सेवा कोणत्याही अडथळ्याशिवाय प्राप्त करू शकतात. यासाठी त्यांना लांबच लांब रांगा लावायची गरज नाही आणि प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी कार्यालयात असंख्य फेऱ्याही माराव्या लागत नाहीत. ही संपूर्ण प्रक्रिया वेळेचीही बचत करते.
TUSHAR DILIP PAWALE
मुळशी 🚩🚩💪🏻👌🌹🌹