logo
add image
add image
Blog single photo

मतिमंद मुलांच्या शाळेत अन्नधान्य वाटप करून चि.विश्वजीत नरेंद्र मारणे याचा वाढदिवस साजरा.


पिरंगूट : उरवडे गावचे माजी उपसरपंच पै.नरेंद्र उर्फ गणेश मारणे यांनी आपला चिरंजीव विश्वजीत याचा वाढदिवस कोरोनाजन्य परिस्थितीचा विचार करून धुमधडाक्यात साजरा न करता भुगाव येथील मतिमंद मुलामुलींचे निवासी पुनर्वसन केंद्र असणाऱ्या अनिकेत सेवाभावी संस्था या ठिकाणी सहकुटुंब जाऊन गहू,तांदूळ,तेल बिस्किट, केळी अशा प्रकारचे अन्नदान वाटप करून साजरा केला.

            सामाजिक कार्यात कायम अग्रस्थानी असणारे पै.नरेंद्र मारणे हे मुळशी तालुक्यातील विविध पदावर काम करणारे व्यक्तिमत्त्व असून नेहमी सकारात्मक दृष्टीने काम करणारे जागृत पालक आहेत.आपल्या मुलाप्रमाणे गोरगरिबांच्या आणि अनाथ,अपंग व मतिमंदांच्या जीवनात आनंदाची गंगा वाहून सकल जनांच्या चेहर्‍यावर आनंद ओसांडवा. म्हणून आगळ्यावेगळ्या पद्धतीने त्यांच्या परिवाराने वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले.प्रत्येकाने जर असा नाविन्यपूर्ण उपक्रम केला तर गोरगरिबांच्या जीवनात नक्कीच चैतन्य निर्माण होऊन सामाजिक बांधिलकी जपली जाईल."ज्या समाजात आपण नावलौकिकास येतो त्या समाजाचे आपण काही देणे लागतो.याच जाणिवेतून पै. गणेश मारणे यांनी केलेला हा एक उत्कृष्ट प्रयत्न आहे" असे प्रतिपादन संस्थेमार्फत करण्यात आले. 

          प्रसंगी कार्यक्रमाला उरवडेगाव दूध संघाचे माजी चेअरमन श्री.देवदास मारणे,दत्तात्रय मारणे, पै.बजरंग मारणे,पै.हेमंत माझिरे,पै सुशांत मारणे,विशाल पोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते

add image
add image

Leave Comments

Top