पौड : कुळे ( ता.मुळशी ) येथील विद्यमान सरपंच बबन लक्ष्मण मराठे ( वय.६५ ) यांचे आज निधन झाले आहे.
जानेवारी महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत ते निवडून आले होते तर फेब्रुवारी महिन्यात त्यांची सरपंचपदी निवडही झाली होती. त्यांनी कुळे गावचे याआधी उपसरपंचपदी भुषविले आहे. दोन महिन्यापासून ते आजारी होते. त्यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू होते. माञ आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, भाऊ,नातवंडे असा मोठा परिवार आहे.