logo
add image
add image
Blog single photo

मुळशीला पावसाने झोडपून काढले


पौड : गेल्या दोन दिवसांपासून मुळशी तालुक्यात सुरू असलेल्या पावसाने शुक्रवारी ( दि.१८) रोजी मुसळधार रूप धारण करत मुळशीकरांना झोडपून काढले. 

        पडत असलेल्या मुसळधार पावसांमुळे  मुळा- मुठा - वळकी नद्यांची पाणी पातळीतही वाढ झाली आहे. तालुक्यातील सर्व रस्त्यावरून पाणी वाहत असून वाहनचालकांना वाहने चालविणेही अवघड झाले आहे. मुळशी तालुक्यातील मुख्य रस्ता असलेल्या पुणे कोलाड रस्त्याची अनेक ठिकाणी वाट लागली असून राम नदी, लवळे फाटा, पिरंगूट पोलिस चौकी समोरील ओढा, सुतारवाडी घाट, शेरे या ठिकाणी असलेल्या खराब रस्त्यामुळे वाहनचालकांना अक्षरशः कसरत करावी लागत आहे.

        पिरंगूट घाट आणि सुतारवाडी घाटात अर्धवट ठेवलेल्या रस्त्याच्या कामामुळे खडी, दगडी रस्त्यावर वाहून आलेल्या आहेत तर पाणी जाण्यासाठी गटाराची व्यवस्था नसल्याने पाणी सुध्दा रस्त्यावरूनच वाहत आहे. कासारआंबोली येथेही रस्त्याच्या कामाचे सिमेंट काँक्रीटीकरणाच्या अर्धवट कामामुळे तर सुतारवाडी येथील गोकूळ मंगल कार्यालयासमोर सालाबादप्रमाणे पाणी रस्त्यावरुन वाहत असल्याने येथील रस्ता वाहतूकीसाठी धोकादायक बनला आहे.

add image
add image

Leave Comments

Top