logo
add image
add image
Blog single photo

महिला पोलिस रेणुका भांगरे यांचा सत्कार


पिरंगुट, दि. ११ (वार्ताहर) - करोना काळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महिला पोलिस रेणुका मारूती भांगरे यांचा गौरव करण्यात आला. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. 

                  करोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्द्ल पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आला. यामध्ये मुळशी तालुक्यातील असलेल्या रेणुका भांगरे यांचाही समावेश होता. अजित पवार यांच्या प्रशस्तीपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर, पोलीस उपायुक्त पंकज देशमुख,  श्रीमती स्वप्ना गोरे, मितेश घट्टे, प्रियांका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

                रेणुका भांगरे या मुळशी तालुक्यातील वाळेण गावच्या आहेत. २०१६ मध्ये त्या पुणे शहर पोलिस दलात सामील झाल्या आहेत. त्या सध्या शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात कर्तव्य बजावत आहे. नोकरी सांभाळून त्या आपल्या कुटुंबाला हातभार लावत आहे. त्यांच्या मागे आई, वडील ,५ बहिणी आहेत. दोन बहिणीचा विवाह झाला असून दोन लहान बहिणीच्या शिक्षणाचा खर्च त्या करत आहे.

add image
add image

Leave Comments

Top