logo
add image
add image
Blog single photo

सुनिलशेठ वाडकर,रामभाऊ गायकवाड,समीर शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कासारआंबोली येथे विविध उपक्रमांचे आयोजन


पिरंगूट : कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनिलशेठ वाडकर, रामभाऊ गायकवाड तसेच राष्ट्रवादी काँग्रेस युवक उपाध्यक्ष समीर शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कासारआंबोली येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायत सदस्य माधुरी सागर धुमाळ यांनी या उपक्रमांचे आयोजन केले होते.

        कोरोना काळात कासारआंबोली ग्रामपंचायत हद्दीत उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा वर्कर आशाताई लांडगे, कल्पना पानसरे, वैशाली तापकीर यांचा कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. भवानीनगर मधील  ३० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलेनागरिकांनानाही  १७५ आयुर्वेदीक किट वाटप करण्यात आले.तसेच भवानीनगर या ठिकाणी फळ झाडे लावून वृक्ष रोपण करण्यात आले.

       यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, भोर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुनील चांदेरे, जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित कंधारे,शिवसेना नेते नानासाहेब शिंदे,सरपंच सचिन धुमाळ,माजी सरपंच राजाभाऊ मारणे,  पोलिस पाटील स्वाती सुतार,उपसरपंच स्वप्निल शिंदे, ग्रामपंचायत सदस्य रंजित गायकवाड,सुवर्णा मारणे,रेश्मा गायकवाड,प्रिती शिंदे, माजी सरपंच गणेश सुतार,भोर विधानसभा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष सागर धुमाळ, माजी सरपंच रमेश चव्हाण, युवा नेते बाळासाहेब शिंदे, अंकुश गोडांबे,माजी सरपंच संतोष शिंदे,माजी उपसरपंच शेखर शिंदे,माजी चेअरमन मारूती शिंदे,सुनील शिंदे,भरत गायकवाड,तुषार मानकर,भरत उभे,गणेश शिंदे,मिठू सुद्रीक,आत्माराम तापकिर,आदी मान्यवर उपस्थित होते.

add image
add image

Leave Comments

Top