logo
add image
add image
Blog single photo

मुळशी धरण भागात युवा सेनेकडून ४०० किराणा किटचे वाटप


मुळशी : मुळशी तालुक्यातील धरणग्रस्त भागातील आदीवासी, कातकरी,धनगर वाड्या वस्त्यावर कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर  एक हात मदतीचा या भावनेतून युवा सेना जिल्हा प्रमुख अविनाश बलकवडे यांनी ४०० किराणा किटचे वाटप केले आहे.

         मुळशी धरण भागातील आंबवणे, पेठशहापुर, देवघर, जांबुळने, गेळदाड, माझगाव , बार्पे तिसकरी, तैलबैला, भांबर्डे, ऐकोले, आडगाव, आसनवाडी, घुटके,घनगड,मापारी बार्पे आडगाव, वांद्रे गोठेवस्ती, वांद्रे(भोरकस),वडुस्ते, निवे,ताम्हिणी, डोंगरवाडी,दावडी या गावांमध्ये शिवसेना युवासेना मुळशी तालुक्याच्या वतीने युवासेना पुणे जिल्हा युवाअधिकारी अविनाश  बलकवडे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि दिव्यांग संस्थेचे श्री शहा आणि भागवत यांच्या माध्यमातून ४०० अन्न-धान्य किटचे वाटप पहिल्या टप्प्यात करण्यात आले. सदरच्या किटच्या माध्यमातून महिनाभर पुरेल एवढे राशन आणि मुबलक प्रमाणात कांदे बटाटे गरीब, गरजू आणि मागास समाजातील लोकांना देण्यात आले. कोरोनाच्या भयानक परीस्थितीमुळे लोकांच्या केवळ आरोग्याच्याच समस्या उभ्या राहिल्या नसून अनेकांना नोकरी, रोजगार देखील गमवावे लागले आहेत, परिणामी अनेकांवर उपासमारीची वेळ आली असून एक हात मदतीचा या भावनेतून युवासेनेच्या प्रयत्नातून आज या किटचे वाटप गावोगावी वाड्यावस्तीनवर जाऊन करण्यात आले. 

       या  कार्यक्रमाचे आयोजन युवासेना जिल्हायुवा अधिकारी अविनाश बलकवडे, शिवसेना तालुका समनव्यक हनुमंत सुर्वे, तालुका अधिकारी संतोष तोंडे, माजी युवासेना कार्याध्यक्ष राम गवारे, प्रसिद्धीप्रमुख वसंत बोडके, उपतालुकाप्रमुख अनिल अधवडे, श्रीराम वायकर, योगेश बामगुडे, युवासेना उपतालुकाधिकारी दत्ता पठारे,विभागप्रमुख दत्ता गोरे, शिवाजी बलकवडे, दिलीप तिडके, रमेश पडवळ, शंकर जांभुळकर,नरेश हुंडारे, उपविभाग अधिकारी गजानन हिरवे, किसन सोनार,अनंता खेडेकर,शिवाजी शिळीमकर, प्रकाश सोनार यांनी केले.

       यावेळी आंबवणे गावचे सरपंच मछिंद्र कराळे,उपसरपंच गोरख मेहता, भाऊ गोरे,आबा दिघे, शंकर कालेकर, प्रकाश मानकर, यशवंत सुतार,एकनाथ जांभूळकर,नथू सोनार,अर्जुनमामा पठारे,अर्जुन सोनार,विष्णू ढोरे ,पांडुरंग दुडे, अनिल शिंदे, पप्पु भिंताडे, राजू  शिंदे,राजू बामगुडे  पोलीस पाटील गणेश मेणे, गुरुदास मेणे तसेच  शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक,युवासैनिक व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

      वेल्हे आणि मुळशी तालुक्यात शिवसेना आणि युवासेनेच्या माध्यमातून ५००० मास्क व २५०० सँनिटायझरचे वाटप करण्यात आलेले असून सध्या धरणग्रस्त भागात किराणा किटचे वाटप सुरू आहे. लाँकडाऊनमुळे अनेक कुटुंबापुढे उदरनिर्वाह करणे कठीण झालेले असून सामाजिक भावनेच्या माध्यमातून शिवसेना व युवासेनेच्या माध्यमातून हे उपक्रम राबविण्यात येत असल्याचे युवासेना जिल्हाधिकारी अविनाश बलकवडे यांनी सांगितले.

add image
add image

Leave Comments

Top