पौड : पौड ( ता.मुळशी ) कचरा समस्येवर नुकतेच सूञ हाती घेतलेल्या ग्रामपंचायत सदस्य मंडळाने मार्ग काढून पौड - विठ्ठलवाडीकरासाठी कचरा गाडी सुरू केलेली असून या गाडीचे उदघाटन जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित कंधारे यांच्या हस्ते करण्यात आले.भविष्यात लवकरच पौडसाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून घनकचरा प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अमित कंधारे यांनी दिली.
तालुक्याचे ठिकाण असलेल्या पौडमध्ये गेली अनेक वर्षे कचरा समस्या गंभीर बनत चालली होती.पौडमध्ये प्रवेश करायच्या सर्व रस्त्यावर भाजी, चिकन, सलून,हाँटेल तसेच घरगुती कचय्राचे ढिग दिसायचे. याठिकाणी ग्रामपंचायतने कचरा उचल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी नागरिक आणून टाकत असलेल्या कचय्रामुळे परिस्थिती पुन्हा तशीच व्हायची.
माञ सरपंच जगदिश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली कचरा या समस्येवर काम करताना कचरा गाडी पौड - विठ्ठलवाडीकरांच्या सेवेत आजपासून दाखल झाली असून दिवसाआड हि गाडी कचरा गोळा करणार आहे. ग्रामपंचायत कार्यालय पौड येथे आज या कचरा गाडीचे उदघाटन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमित कंधारे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच जगदिश लांडगे, उपसरपंच रसिका जोशी, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद शेलार, प्रशांत वाल्हेकर, प्रकाश शिंदे,नंदा नवले, पोलिस पाटील संजय पिंगळे, माजी सरपंच संपत दळवी, तंटामुक्ती अध्यक्ष भगवान ढोरे, श्रीकांत केणी, गणपत भोयणे, शामराव वाचकवडे, चंद्रकांत शेलार, शामराव नवले, ग्रामसेवक विजय कदम तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पौड गावामध्ये गेली अनेक वर्ष सुरू असलेली कचरा समस्या सोडविण्यासाठी या ग्रामपंचायत सदस्याने निवडून आल्यानंतर भर दिला होता. कचरा गाडी गावात फिरणार असून ओला कचरा व सुका कचरा नागरिकांनी वर्गीकरूनच आणावा. अन्यथा कचरा गाडीमध्ये घेतला जाणार नसल्याची सूचना ग्रामपंचायत सदस्य प्रमोद शेलार यांनी केली आहे.
अनेक वर्ष कचरा ग्रामस्थ रस्त्याच्या कडेला टाकायचे. तालुक्याचे गाव असूनही प्रवेशव्दारावरच दुर्गधीचे राज्य होते. आता कचरा गाडी सुरू करण्यात आलेली असून कचरा गाडीमध्येच टाकावा. अन्यञ कचरा टाकताना आढळल्यास त्याच्यावर ग्रामपंचायतकडून दंडात्मक कारवाई होणार असल्याचे सरपंच जगदिश लांडगे यांनी सांगितले.
पौडची कचरा समस्या जडील होती. कचरा गाडी सुरू करून ग्रामपंचायत कचरा समस्येवर मार्ग काढण्यास सुरूवात केलेली असून ग्रामपंचायतच्या पौड येथील दहा गुंठे जागेवर खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा प्रकल्प सुरू करणार असल्याचे जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित कंधारे यांनी सांगितले.