logo
add image
add image
Blog single photo

मुळशी तालुक्यातील वाजंञीना अन्नधान्य किटचे वाटप


पौड : मुळशी तालुक्यातील वाद्ये संस्कृतीचा संस्कार वाजंत्री कलाकांरानी जपलेला आहे.हि कला जोपासत असताना त्यांचे कौंटुबिक उदरनिर्वाहाचे साधनच ही कला आहे.मुळशी तालुक्यातील २५ कुटुंबातील वाजंञीना भुगावच्या सरपंच निकिता रमेश सणस, उद्योजक रमेश गुलाब सणस, माजी उपसरपंच राहुल शेडगे व स्वाती राहुल शेडगे या दोन्ही उभयातांनी कु.सृष्टी रमेश सणस हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण, मुळशीचे गटविकास अधिकारी संदिप जठार यांच्या हस्ते अन्नधान्य किटचे वाटप केले आहे.

        आज कित्येक वर्षे पारंपारिक वाद्ये संस्कृतीचा संस्कार या वाजंत्री कलाकांरानी जपलेला आहे.हि कला जोपासत असताना त्यांचे कौंटुबिक उदरनिर्वाहाचे साधनच ही कला आहे.या वाजंञी कलाकारांचा लग्न सराईत हलगी,ताशा,तुतारी,सनई,ढोलकी इत्यादी वाद्ये वाजंत्री ताफा तयार करतात.या कोरोना संकटात हा वाजंत्री कलाकार सापडला आहे त्यामुळे या समाजाला उदरनिर्वाह करता एक महिन्याचे जीवनावश्यक वस्तु सणस आणि शेडगे परिवाराकडून पौड येथे वाटप करण्यात आले.

         यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सविता दगडे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे,सभापती पांडुरंग ओझरकर,उपसभापती विजय केदारी,भोर विधानसभा अध्यक्ष सुनील चांदेरे, भाजपा महिला आघाडी मुळशी तालुका अध्यक्षा वैशाली सणस, राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष अंकुश मोरे,युवा अध्यक्ष निलेश पाडाळे,सुहास दगडे, मनोहर सणस, मंडल अधिकारी अनिल शेडगे,विस्तार अधिकारी जाधव ,मोमीन, उपसरपंच भुकुम सचिन आंग्रे, सचिन हगवणे, ग्रामविकास अधिकारी मदन शेलार,शंकर सणस,अर्चना सुर्वे,रेश्मा सणस आदी उपस्थित होते.

add image
add image

Leave Comments

Top