logo
add image
add image
Blog single photo

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळीत जिवाची बाजी लावणाऱ्या कोरोना योध्यांना आरोग्य किटचे वाटप


पिरंगुट : जे खरे वॉरियर्स आहेत त्यांचे रक्षण व्हावे या हेतूने राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया सरचिटणीस सतीश सुतार यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कासारआंबोली येथील कोव्हीड केंद्रास शंभर आरोग्य किटचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत अनावश्यक खर्च टाळून सोनेरी मुळशी परिवाराचे सदस्य सतिश सुतार यांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद असुन त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

यावेळी म्हाडाच्या संचालिका स्वाती ढमाले, शिवसेना समन्वयक दिपक करंजावणे, कासारआंबोलीचे सरपंच सचिन धुमाळ, माजी सरपंच राजेंद्र मारणे, कासारआंबोलीच्या पोलिस पाटील स्वाती सुतार, वातूंडेचे पोलिस पाटील राम मानकर, माजी सरपंच गणेश सुतार, सकाळचे वरिष्ठ उपसंपादक निलेश शेंडे, प्रविण सातव, गोरख माझिरे, विजय वरखडे, आशा सेविका आशा लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

मुळशीतील पोलिस बांधव, प्रशासन व आरोग्य विभाग सध्या कोरोना काळामध्ये अत्यंत चांगले काम करत असून सर्व पेशंटची चांगल्या प्रकारे काळजी घेतली जात आहे. त्यामुळे मी ही माझी जबाबदारी समजून छोटीशी मदत करीत आहे, असे सतिश सुतार यांनी सांगीतले. तसेच माझ्या सहकाऱ्यांनीही यांनीही यासाठी मला मदत केली आहे’, असेही त्यांनी सांगितले.

add image
add image

Leave Comments

Top