logo
add image
add image
Blog single photo

तौक्ते चक्रीवादळाचा मुळशीलाही बसणार तडाखा


पौड : तौक्ते वादळाचा मुळशी तालुक्याला तडाखा बसणार असून पौड पोलीस स्टेशन तर्फे सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते आहे की, सायंकाळी चार नंतर मुळशी तालुक्यात या वादळाचा जोर जाणवणार असून नागरिकांनी बाहेर कुठेही न जाता घरीच थांबावे.सदर चक्रीवादळाबाबत जाणकार तज्ञांनी मत व्यक्त केलेले आहे.

      या वादळामुळे पश्चिम महाराष्टात देखील त्याचा प्रभाव अधिक असणार आहे. संपुर्ण मुळशी तालुका  हा किनारपट्टीच्या लगत असल्याने त्यासाठी आपण सर्वांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

१) संकटकाळात उपयोगी पडण्यासाठी प्रथमोपचार पेटी व औषध, गोळ्या घरात उपलब्ध ठेवा.

२) इलेक्ट्रॉनिक उपकरणं बंद करा, गॅस ही वापरानंतर बंद करा.

३) घराची दार खिडक्या बंद ठेवा

४) मोबाईल फुल्लचार्ज, बॅकअप बॅटरी, इन्व्हर्टर, टॉर्च इत्यादी उपकरणे चार्ज करून ठेवा.

५) महत्वाची कागदपत्रे सुरक्षित ठिकाणी ठेवा. पावसाच्या पाण्यापासून त्याचे संरक्षण होईल याची काळजी घ्या.

६) जर तुमची घरे असुरक्षित असतील तर तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा.

७) झोपडपट्टी/डोंगराळ भागात असलेली घरे/कच्ची बांधकामे असलेली घरे, पत्र्याचे शेड मध्ये राहणारे लोकांनी ताबडतोब सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.

८) मोडकळीस आलेल्या घरात/इमारतीमध्ये थांबू नका अथवा जाऊ नका.

९) पाळीव जनावरे यांना बांधून न ठेवता मोकळे सोडा.

१०) विद्युत तारा, लाईटचे खांब यांचे पासून लांब रहा.

११) झाडाच्या आडोश्याला थांबू नका अथवा जवळ जाऊ नका.

१२) चक्रीवादळात महावितरण कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. आपले मोबाईल चार्जिंग करून आवश्यक कारणासाठी वापरावा.

१३) अत्यावश्यक सेवेचे संपर्क नंबर आपल्याकडे सेव्ह करून ठेवा.

१४) चक्रीवादळा दरम्यान कोणीही घराबाहेर पडू नका.

१५) चक्रीवादळासोबतच कोरोना संसर्ग अनुषंगाने देखील काळजी घ्या. कोठेही गर्दी करू नका.

१६) पिण्याचे पाणी, मेणबत्ती, जीवनावश्यक वस्तू यांचा घरात पुरेसा समावेश करून ठेवा.

१७) अफवांवर विश्वास ठेवू नका.

१८) पौड पोलीस व पुणे ग्रामीण पोलीस दल, तसेच  इतर अत्यावश्यक सेवा देणारे विभाग, संस्था हे सर्व सोयीसुविधेसह चीवीस तास सातही दिवस सतर्क आहेत.

१९) आम्ही आपली काळजी घेत आहोत कृपया आपण सुरक्षित घरातच थांबा.

२०) आपण सर्वांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

२१) येणारा काळ जरी कठीण असला तरी त्यावर आपण सर्व मिळून नक्कीच मात करणार आहोत.

२२) संकट भारी आहे पण प्रशासन खंबीर आहे.

२३) आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.

२४) पावसात भिजण्याचा मोह टाळा त्यापासून आजारी पडण्याची शक्यता अधिक आहे.

२५) पाणी उकळून व गरम करूनच प्या.

२६) मदत लागल्यास पौड पो स्टे  किंवा टोल फ्री क्र १०० यावर संपर्क साधा

      पौड पोलीस व स्थानिक प्रशासन आपल्या सुरक्षेसाठी रस्त्यावर थांबून आहे.सर्व नागरिकांनी आपल्या कुटुंबासाठी सुरक्षित स्थळी थांबून रहावे. सर्व परिस्थिती लवकरच सुरळीत होईल अशी अपेक्षा करू असे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी सांगितले.

add image
add image

Leave Comments

Top