पौड : मुळशी तहसिल कार्यालयाच्या पौड येथील इमारतीचा अंतिम आराखडा वास्तुविशारद यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करुन मंजूर करण्यात आला असुन १५ कोटी रूपये खर्चून २१ हजार स्क्वेअर फुटचे बांधकाम यामध्ये करण्यात येणार आहे. भोर - वेल्हा - मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नातून विशेष अर्थसंकल्पीय तरतुदीमधून हे काम मार्गी लवकरच मार्गी लागणार आहे. पौड येथे असलेली तहसिलदार कार्यालयाची इमारत प्रशस्त व्हावी म्हणून अनेक वर्षापासून विविध राजकीय पक्षांनी मागणी केली होती.लवकरच टेंडर प्रक्रिया पूर्ण करून बांधकामाला देखील सुरूवात होणार आहे.यामुळे अनेक वर्षाचा प्रलंबित विषय संपणार आहे.
पौड येथे असलेली तहसिलदार कार्यालयाची इमारत ब्रिटीश कालीन असून कौलारू आहे. पाठीमागे लगेचच डोंगर लागत असून पावसाळ्यात येथील खोल्यामध्ये पाणी पाझरते. पण आता होणाऱ्या अत्यंत सुसज्ज व अत्याधुनिक अशा इमारतीमध्ये तहसीलदारांसाठी स्वतंत्र अद्ययावत केबीन, ५ निवासी नायब तहसीलदारांसाठी स्वतंत्र केबीन, कागदपत्रे जतन करण्यासाठी अद्ययावत महसूल अभिलेख कक्ष, ज्येष्ठ नागरिक कक्ष, दिव्यांग कक्ष, मॅजिस्ट्रेट कस्टडी, लिफ्ट सुविधा असे १४ कोटी रुपयांचे बांधकाम व १ कोटी रूपये फर्निचरसाठी आराखडा तयार करण्यात आला.
आमदार संग्राम थोपटे यांनी पौड येथील तहसिलदार कार्यालय, पोलिस स्टेशन, कारागृह तसेच पाठी मागील बाजूस जाऊन पाहणी काली. यावेळी तहसीलदार अभय चव्हाण, पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, बांधकाम विभाग शाखा अभियंता श्री. रणसिंग,महावितरणचे अभियंता फुलचंद फड, मुळशी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गंगाराम मातेरे, युवक अध्यक्ष सुहास भोते,युवा नेते मधुर दाभाडे, बबनराव धिडे, दादाराम मांडेकर, पौडचे सरपंच जगदीश लांडगे, कोळवणचे सरपंच धनश्री पालकर , भरत सातपुते, पोलिस पाटील संजय पिंगळे, संदिप केदारी, अमित जांभुळकर, सचिन किर्वे, पप्पू खोले,संदिप हुलावळे, अविनाश शिंदे, गोपाळ कदम, सहादू टेमघरे ,उपसरपंच भाऊ क्षीरसागर उपस्थित होते.