logo
add image
add image
Blog single photo

मुळशीत पुर्व भागातील मोठ्या गावात दहा दिवसांचा कडक लाँकडाऊन


पिरंगूट : मुळशी तालुक्याच्या पौड पोलिस स्टेशन हद्दीतील पूर्व भागातील मोठ्या गावात कोरोना बाधित रूग्ण सापडण्याचे प्रमाण मोठे आहे. याच धर्तीवर १५ मे ते २५ दरम्यान दहा दिवस कडक लाँकडाऊन पाळण्याचा निर्णय पिरंगूट येथे झालेल्या बैठकीत सर्वसंमतीने आज घेण्यात आला.हि बैठक मुळशीचे तहसिलदार अभय चव्हाण, पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये पिरंगूट, भुगांव, कासारआंबोली, उरवडे, पौड,घोटावडे,भरे,अंबडवेट, लवळे, नांदे,भुकूम या गावचे सरपंच,उपसरपंच,पोलिस पाटील उपस्थित होते. 

     यावेळी बोलताना तहसिलदार अभय चव्हाण म्हणाले की, मुळशी तालुक्यात पहिल्या लाँकडाऊनपासून जनजागृती चांगली झाली आहे.माञ यावेळी कुटुंबच्या कुटुंब पाँझिटीव होत आहेत. रस्त्यावरील गावे लोकसंख्येने मोठी आहेत. प्रशासनला काम करताना मर्यादा आहेत. ज्या ठिकाणी कामगार वर्ग जास्त राहत आहे किंवा जिथे पाँझिटीव रूग्ण सापडत आहेत तिथे ग्रामपंचायतीने लक्ष्य ठेवणे गरजेचे आहे. कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये. यावेळी कोरोनाचा प्रसार वेगाने होत असून मोठी गावे दहा दिवसासाठी लॉकडाऊन करावे असे आवाहन करत आहे. मात्र हा निर्णय स्थानिक पातळीवर सर्वांनी एकत्र येऊन घ्यावा.

     यावेळी बोलताना पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ म्हणाले की , भुगांव,पिरंगूट,लवळे या ठिकाणी पन्नास पेक्षा जास्त रूग्ण आहेत. लाँकडाऊन असलेल्या गावातील नागरिक दुसऱ्या गावात खरेदीला जातात. सध्या मुळशी तालुक्यात कोरोना रूग्णाची संख्या कमी होत असून अजून दहा दिवसाचा कडक लाँकडाऊन आवश्यक आहे. कमी रूग्ण संख्या असली तर लक्ष्य देता येते. बाहेर कामाला जाणाऱ्यानी डबल मास्क वापरणे तसेच घरातील सदस्यापासून दूर राहणे गरजेचे आहे. दहा दिवस सरपंच,पोलिस पाटील,ग्रामसेवक व पोलिस यंञणा यांनी एकञित येऊन काम करणे गरजेचे आहे.ज्या घरात पाँझिटीव रूग्ण आहे. त्या घरातील नागरिकांनी बाहेर फिरू नये. जर असे आढळले तर त्याची माहिती पोलिस स्टेशनला द्यावी. त्याच्यावर कारवाई केली जाईल.

     यावेळी भुगावच्या सरपंच निकिता सणस,  भुकुमचे उपसरपंच सचिन आंग्रे, लवळ्याचे उपसरपंच रणजित राऊत, माजी सरपंच संजय सातव, कासारआंबोलीचे सरपंच सचिन धुमाळ, उपसरपंच स्वप्निल शिंदे, पोलिस पाटील स्वाती सुतार, उरावडेच्या पोलिस पाटील निशिगंधा गुरव, भुकूमचे पोलिस पाटील सतीश गुजर, लवळ्याचे पोलिस पाटील संपत राऊत, अंबडवेटचे पोलिस पाटील प्रकाश नागरे, मुकाईवाडीच्या पोलीस पाटील स्वाती गोळे, उपसरपंच लक्ष्मण निकटे, नांदेचे पोलिस पाटील दत्तात्रय रानवडे, पिरंगूट व्यापारी संघाचे संस्थापक राहूल पवळे, ग्रामपंचायत सदस्य महेश वाघ, सागर धुमाळ, चंद्रकांत चोरघे, तलाठी नामदेव पासलकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

add image
add image

Leave Comments

Top