logo
add image
add image
Blog single photo

विश्व हिंदू परिषद बजरंग दल-दुर्गावाहिनी मुळशी प्रखंड व सह्याद्री प्रतिष्ठान मुळशी तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे पिरंगुटमध्ये आयोजन


पिरंगुट: वाढत्या कोविड महामारीच्या काळात ही महामारी थोपवण्यासाठी त्यावर प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण देशभरात चालु आहे, लसीकरण केल्यानंतर 50-60 दिवस रक्तदान करता येत नाही, यामधल्या काळात भासणारा संकलित रक्त पिशव्यांचा तुटवडा भरुन काढण्यासाठी धर्मवीर छञपती श्री संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधत विश्व हिंदू परिषद बजरंग दल-दुर्गावाहिनी मुळशी प्रखंड व सह्याद्री प्रतिष्ठान मुळशी तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने शिवकालीन श्री तुळजा भवानीमाता मंदिर पिरंगुट , घोटावडेफाटा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही संघटनांच्या आव्हानाला प्रतिसाद देत १३१ रक्तदात्यांनी यात भाग घेतला होता.  या रक्तदान शिबिराला संजिवनी ब्लड बँकेने सहाय्य केले.

यावेळी सह्याद्री प्रतिष्ठाणचे  संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे व संघटक नंदकुमार देशमुख , विश्व हिंदू परिषद मुळशी प्रखंड अध्यक्ष आचार्य श्री मंदार स्वामी यनपुरे , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा.संघचालक मुळशी तालुका श्री कैलासआप्पा चोंधे , सह्याद्री प्रतिष्ठाण मुळशी तालुका अध्यक्ष दत्तामामा कुंजीर, विश्व हिंदू परिषद प्रखंडमंत्री रोहन मा. निकटे व सहमंत्री सदानंद मारणे यांच्या हस्ते छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज, प्रभु श्रीराम, श्री तुळजाभवानीमाता व भारतमाता यांच्या प्रतिमांचे पूजन करुन रक्तदानास सुरुवात झाली.

विहिंप पुणे व पिंपरी चिंचवड जिल्हा कार्याध्यक्ष श्री धनाजीमामा शिंदे , बजरंग दल चिंचवड विभाग संयोजक श्री संदेशभाऊ भेगडे , विहिंप चिंचवड जिल्हा मंत्री श्री संजयभाऊ शेळके यांनी आज रक्तदान शिबिराला भेट देऊन पुढिल कार्यास शुभेच्छा दिल्या.

रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले होते , रक्तदान शिबिर पूर्ण झाल्यावर दुर्गावाहिनीतर्फे मंदिराची साफसफाई करुन मंदिर निर्जंतुकीकरण करण्यात आले या रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचे मनापासून आभार.

या भव्य रक्तदान शिबिरात बजरंग दलचा एक कार्यकर्ता रोहन जाधव यांच्या मातोश्रींचे गेल्या महिन्यात निधन झाले होते सामाजिक भान राखत आपल्या मातोश्रींना एक प्रकारे श्रध्दांजली वाहण्यासाठी या रक्तदान शिबिरात भाग घेऊन रक्तदान केले, रक्तदान करतानी त्यांच्या गरोदर पत्नीही तिथे उपस्थित होत्या.


add image
add image

Leave Comments

Top