logo
add image
add image
Blog single photo

लव्हार्डे व पाथरशेत येथे आदिवासी कुटुंबाना अन्नधान्य वाटप


पिरंगूट : मुळशी तालुक्यातील पाथरशेत, आडमाळ,पळसे, लव्हार्डे येथील आदिवासी वस्तीवर अखिल भारती नगर मित्र मंडळा तर्फे विनायक कडू यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नधान्य, दैनंदिन लागणाऱ्या वस्तूंचे वाटप करण्यात आले.लव्हार्डे व पाथरशेत येथे हा कार्यक्रम पार पडला.

       कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक शोषित, वंचित, दुर्लक्षित घटकांतील समुदायांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात आदिवासी आणि कातकरी समुदायाचादेखील समावेश आहे. संतोष मरगळे, किरण भरेकर या युवकाने या अदीवासी वस्तीशी संपर्क साधला.

        आपण राहत असलेल्या समाजाचे आपण एक देणेकरी आहोत ही भावना आज कुठेतरी मंडळाच्या सर्व सगळ्या सदस्यांच्या मनात रुजली.असेच समाजिक उपक्रम भविष्यात राबवण्याचा संकल्प मंडळातील सर्व सहकार्यांनी घेतला.

add image
add image

Leave Comments

Top