पौड : आंदेशे गावचे पोलिस पाटील संदेश हरगणे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोणताही अनाठायी खर्च न करता गावामध्ये एक हजार मास्कचे वाटप केले आहे.
सध्या लाँकडाऊनच्या काळातही अनेक जण आपल्या वाढदिवसानिमित्त लाखो रूपयांचा अनाठायी खर्च करताना दिसून येत आहेत. माञ आंदेशे ( ता.मुळशी ) गावचे पोलिस पाटील संदेश हरगणे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त गावात एक हजार मास्कचे वाटप करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
सर्वञ कोरोनाने हाहाकार माजविला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. वाढदिवस साजरा न करता वायफट होणाऱ्या खर्चात एक हजार मास्कचे वाटप करण्यात आले. नागरिकांनी मास्क वापरून सुरक्षित राहावे असे मत पोलिस पाटील संदेश हरगणे यांनी यावेळी व्यक्त केले.