पिरंगूट : शिवसेना व भारतीय कामगार सेनेच्या वतीने १ मे कामगार दिनानिमित्त मुळशी तालुक्यातील रोची ईजींनियरीगं प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील कामगार विजय गोरक्षनाथ सागर यांना या वर्षीचा आदर्श कामगार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार शिवसेनेचे राम गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आला.
या प्रसंगी भारतीय कामगार सेना कार्यकारणी सदस्य सदेंश सुर्वे, रोची ईजींनियरीगं युनीट अध्यक्ष शाम भेगडे, नाल्को वाँटर ईडिंयाचे नारायन अडसूळ आदी मान्यवर उपस्थित होते. गेली २५ वर्षा पासुन कामगार क्षेञात चागंले काम करणाऱ्या कामगार बाधंवाला कामगार दिनानिमित्ताने १ मे रोजी हा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते अशी माहिती राम गायकवाड यांनी दिली.