पिरंगूट : कामगार दिनानिमित्त कासारआंबोली येथील कोवीड सेंटरमध्ये गेली दहा महिने आरोग्य सेविका म्हणून काम करणाऱ्या कु. पल्लवी कलाणे हिचा म्हाडाच्या संचालिका,शिवसेना माजी जिल्हा संघटीका स्वाती ढमाले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.
पल्लवी हि मुळची औरंगाबाद जिल्ह्यातील असून जिल्हा परिषद पुणेच्या माध्यमातून कंञाटी पध्दतीने तिची भरती झालेली असून गेली दहा महिने कासारआंबोली येथील कोविड सेंटरमध्ये काम करत आहे. कोविड तपासणीसाठी आलेल्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यापासुन तर डाँक्टर नसताना पीपीई किट घालून पेशंटला ॲडमीट करण्यापर्यतचे काम ती उत्तम रित्या पार पाडत आहे. ती करत असलेले काम कौतुकास्पद असून तिच्या या कामाची माहिती मिळाल्यानंतर ती काम करत असलेल्या कासारआंबोली येथील सैनिकीशाळेवर जाऊन स्वाती ढमाले यांनी तिचा सत्कार केला. यावेळी शिवसेनेच्या उपतालुका संघटिका राणी शिंदे यासुध्दा उपस्थित होत्या.