logo
add image
add image
Blog single photo

मुळशीतील तरुणांनो लसिकरणाआधी रक्तदान करा; अन्यथा रक्तपेढीत निर्माण होईल रक्ताचा तुटवडा


पिरंगुट : सिकलसेल, थैलीसीमीया, रक्तक्षय असलेल्या रुग्णांना रक्ताचा पुरवठा करणे गरजेचे असून, रक्ताची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे, तर रक्त संकलनाचे प्रमाण अत्यल्प असून, करे तरी रक्तदान शिबिर घेऊन रक्त संकलन केले जाते. त्यात मगील वर्षांपासून कोरोनामुळे शिबिरांचे आयोजन मंदावले आहे. त्यात आता कोरोनाची लस घेणाऱ्या व्यक्तीला त्यानंतर २८ दिवस रक्तदान करता येत नाही. अशात रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण होणार आहे. 

याकरिता रक्तदात्यांनी रक्तदान करून त्यांनतर लस घ्यावी, असे रक्तपेढीतून कळविले जात आहे. आधीच रक्तदाते कमी असून, त्यात मागील वर्षीपासून कोरोनाच्या भीतीमुळे रक्तदानासाठी नागरिक पुढे येत नसल्याचे दिसत आहे. अवघ्या राज्यातच रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. काही सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांकडून रक्तदान शिबिरांचे आयोजन करून येथील रक्तपेढीची गरज भागविण्यात आली. अशात कसे तरी वर्ष निघून गेले. मात्र आता कोरोना लस आली असून, मोठ्या प्रमाणात नागरिक लस लावून घेत आहेत. यामध्ये युवकांचे प्रमाणही अधिक असून, रक्तदान करणारे हे युवकच आहेत. मात्र एनबीटीसीच्या नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोनाची लस घेणारी व्यक्ती त्यानंतर २८ दिवस रक्तदान करू शकणार नाही. म्हणजेच हजारोंच्या संख्येत लस घेणारे युवक रक्तदान करू शकणार नाही. असे झाल्यास रक्तपेढीला रक्ताचा पुरवठा बंद पडणार व ही बाब गंभीर आहे.  रक्तपेढीलाच रक्तदाते न मिळाल्यास याचे गंभीर परिणाम पडणार. करिता लसीकरणापूर्वी युवकांनी रक्तदान करावे, असे रक्तपेढीकडून कळविण्यात आले आहे. 

युवकांनी पुढाकार घेणे गरजेचे रक्तदात्यांमध्ये जिल्ह्यात ४५ ते ५० वर्ष वयोगटातील खूप लोक आहेत. ते आता लस घेत असल्याने त्यांना पुढचे २८ दिवस रक्तदान करता येणार नाही. अशात त्यांनी आपली सामाजिक जबाबदारी समजून लस घेण्यापूर्वी  रक्तदान करणे गरजेचे आहे. लस घेण्याच्या तयारीत असलेल्या लोकांनी आधी रक्तदान करावे असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे. 


मागील वर्षापासून रक्तदानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कोरोनामुळे रक्तदान नाहीच्याच बरोबर होत आहे. परंतु रक्ताचा तुटवडा पाहून करण्यात आलेल्या आवाहनामुळे सामाजिक जाणीव असलेल्या तरुणांनी पुढे येऊन रक्तदान केले. त्यामुळे रक्ताची मागणी असणाऱ्या रुग्णांचा जीव वाचविता आला. आता कोरोनाचे लसीकरण होत आहे. या लसीकरणासाठी कोरोनाची प्रतिबंधित लस घेणाऱ्यांना २ महिन्यांपर्यंत रक्तदान करता येणार नाही. अशात त्यांनी लसीकरण करण्यापूर्वीच रक्तदान करावे. -संतोष पवळे(संस्थापक/, श्री शिवराय प्रतिष्ठान, पिरंगुट)

add image
add image

Leave Comments

Top