logo
add image
add image
Blog single photo

सर्वांना हसविणारे बाबुशेठ,आज सर्वांना रडवून गेले


पौड : बाबूशेठ दोन कटिंग चहा द्या. पौड बसस्थानकाबाहेर हक्काने घुमणारा हा आवाज आता बंद होणार आहे. गेली वीस वर्ष पौड बसस्थानकाच्या बाहेर हातगाडीवर तसेच बसस्थाकात दहा वर्ष चहाची विक्री करणारे बाबुशेठ आगरवाल यांचे आज ( दि.२३) रोजी दुःखद निधन झाले आहे. सकाळी अकराच्या दरम्यान बाबुशेठ यांच्या मृत्यूची बातमी पौड गावात धडकली आणि सगळ्याच्या काळजाचा ठेकाच चुकल. बाबुशेठ यांच्या मृत्यूची बातमी पौड गावात दहाच मिनिटांत वाय्रागत पसरली.  या कळालेल्या गोष्टीवर कोणाचा विश्वासच बसेना अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

     बाबुशेठ रोशनलाल आगरवाल हे गेली अनेक वर्ष पौड बसस्थानक येथे छोट्याशा हातगाडीवर चहाचा व्यवसाय करीत आहेत. या तीस वर्षात बाबुशेठ यांनी आपल्या स्वभावाने अनेक लोक जोडली. मुळशी तालुक्यातील बदलून गेलेले अनेक सरकारी अधिकारी, कर्मचारी, एसटीचे चालक - वाहक तसेच अनेक नागरिकांनी त्यांच्या हातचा चहा पिलेलाच. त्यामुळं त्यांना अनेक जण ओळखायचे.बाबूशेठ यांनी अनेकांशी गोड बोलत,अनेकांना मदत करत आपला स्नेहभाव जपला होता.त्यात त्यांना त्यांचा मुलगा अमन यानेही मोलाची साथ दिली.

 राहू द्या हो शेठ पैसे

बाबुशेठ यांच्याकडे चहा पिणाय्रांचा फौजफाटा रोज मोठा असायचा. बाबुशेठ कटिंग चहा द्या,बाबुशेठ एक घोट चहा द्या असे म्हणत अनेक जण बाबुशेठ कडे चहा प्यायचे. परंतु पैसे देते वेळी राहू द्या हो शेठ पैसे असे म्हणत बाबुशेठ अनेक जणांना चहा पाजायचे.

पौड बसस्थानकाचा आधारवड हरपला

अनेक वर्ष येथे व्यवसाय करत असल्यामुळे बाबुशेठला पौड बसस्थानतील खाणाखुणा माहित होत्या.त्यामुळे येथील एस.टीचे अधिकारी येथील चावी बाबुशेठ यांच्याकडे ठेवायचे. बाबुशेठ सकाळी लवकर आले की बसस्थानक परिसरातील स्वतः लाईट बंद करायचे तसेच राञी घरी जाताना स्वतः लाईट लावायाचे. शौचालय आणि बसस्थानक येथील पाणी चालू आहे की नाही.टाकी भरली आहे की नाही हे काम ते दररोज करायचे. या कामासाठी त्यांना कोणताही पगार मिळत नव्हता. माञ प्रवाशांच्या सोयीसाठी त्यांनी हे काम गेली कित्येक वर्ष केले.

         शेवटी परमेश्वरी सत्तेपुढे कोणाचे काय चालते. बाबुशेठ यांच्या बातमीने अनेक जणांना आज गहिवरून आले होते. तसेच अनेक जणाच्या डोळ्यात त्यांच्यासाठी पाणी उभे राहिले होते.हिच खरी त्यांना आज आदरांजली ठरली.

   बाबुशेठ आगरवाल यांना समस्त ग्रामस्थ पौड,ग्रामपंचायत पौड आणि व्यापारी संघ पौड यांच्याकडून भावपूर्ण श्रध्दाजंली.


add image
add image

Leave Comments

Top