पिरंगूट : पिरंगुट ( ता.मुळशी ) येथील कोरोना रूग्णाची वाढती संख्या पाहता या विभागाला (हॉट स्पॉट) म्हणून घोषित करत ग्रामपंचायत पिरंगुट व पिरंगुट व्यापारी महासंघ यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेत गुरुवार दि. २२ एप्रिल ते मंगळवार २७ एप्रिल दरम्यान संपूर्ण पिरंगुट मधील व्यापार हा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.यामुळे पिरंगूट मध्ये सर्व दुकाने बंद असून येथे कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
यामध्ये फक्त दवाखाने व मेडिकल या अत्यावश्यक सेवा तसेच दुध डेअरी सकाळी ७ ते ११ याच वेळेत सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत. या व्यतिरिक्त सर्व व्यापार हा पूर्णपणे बंद राहणार आहे. या लॉकडाऊन काळात विनाकारण बाहेर पडणाऱ्या व्यक्तीवर ग्रामपंचायतीच्या वतीने पोलिस प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्य तसेच पिरंगूट व्यापारी महासंघाचे राहूल पवळे यांनी सांगितले.